सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच असे म्हणत महाविकास आघाडी सोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghtana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी घेतला आहे. यावर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी राजू शेट्टींना इशारा दिला आहे. मला विश्वासात घेतलं तर आपण स्वाभिमानी सोबत असू नाही घेतलं तर त्यांच्या शिवाय असा इशारा आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी शेट्टींना दिला. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांची तसेच स्वाभिमानीची मानसिकता खचली आहे. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच. राज्यसरकारमध्ये राहायचं का नाही याचा निर्णय पाच तारखेला घेऊ अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेवर स्वाभिमानीतील नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान देवेंद्र भुयार यांनी आज चूपी तोडत माध्यमांशी संवाद साधला.
राजू शेट्टी यांना इशारा देताना देवेंद्र भुयार म्हणाले, भाजपपेक्षा महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. कर्जमाफी, शेतमालाला चांगला भाव दिला आहे.वीजेचा प्रश्न मार्गी लागणे थोडे कठिण वाटते. पण संघटनेला महाविकास आघाडीतून बाहेर का पडायचे आहे हा मोठा प्रश्न आहे असे ही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ५ एप्रिलच्या बैठकीनंतर मी माझा निर्णय देणार आहे. मला विश्वासात घेतलं तर आपण स्वाभिमानी सोबत राहू नाही घेतलं तर त्यांच्या शिवाय असा इशाराही भुयार यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे. त्यामुळे ५ एप्रिलच्या बैठकीत नेमकं काय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे. अमरावती जिल्ह्यात हिवरखेड येथे २४ तारखेला स्वाभिमानी संघटनेचा मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्स, बॅनरवर देवेंद्र भुयारांचा फोटो नसल्याने चर्चेला उधान आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.