Swayam Talks Pune 2023 : आयुष्याला दिशा द्यायची? मग पुण्यातील 'स्वयं टॉक्स' कार्यक्रम चुकवू नका!

Swayam Talks Pune 2023
Swayam Talks Pune 2023
Updated on

'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने आता 'स्वयं टॉक्स' पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. समाजात अनेक प्रेरणादायी आणि विधायक कामं करणारे लोक आहेत. अशा प्रभावशाली व्यक्तीचं काम आणि समाजाला प्रेरणादायी ठरेल, असा त्यांचा खडतर प्रवास 'स्वयं टॉक्स' कार्यक्रमात उलगडणार आहेत.

Swayam Talks Pune 2023
Caste Census : आम्ही काहीच करू शकत नाही; जातीय जनगणनेच्या मुद्दावर SCची भूमिका

'स्वयं टॉक्स'मध्ये भारतीय आणि जर्मन कंपन्यांमध्ये येणारे 'सांस्कृतिक अडथळे' दूर करणाऱ्या वैशाली करमरकर, मानवी वस्तीतील बिबट्याच्या अस्तित्वावर आधारित ८ शोधनिबंध प्रकाशित असलेले आणि वाईल्डलाईफ व प्रवासाची पॅशन जपणारे स्वप्निल कुंभोजकर, मराठावाड्याचे पहिले 'आयर्नमॅन' ठरलेले नितीन घोरपडे आपल्या जीवनातील चढउतारानंतर मिळवलेल्या यशाची गुपितं सांगणार आहेत. त्यांच्याशी संवाद साधणार माध्यम क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेले आणि विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे डॉ. उदय निरगुडकर!

Swayam Talks Pune 2023
Loksabha Election : मविआमध्ये रस्सीखेच सुरू! मुंबईतील सहापैकी 'या' चार जागांवर ठाकरे गटाचा दावा

हे सर्व वक्ते त्यांचा आश्चर्यकारक प्रवास आणि या प्रवासात आलेले आपले अनुभव सर्वांसोबत शेअर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. विकास ढाकने (अति. आयुक्त पुणे महानगरपालिका) हे उपस्थित राहणार आहेत.

'स्वयं टॉक्स'चा पुण्यातील कार्यक्रम रविवार ८ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यातील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरीयम, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, पांडुरग कॉलनी, एरंडवणे ४११०३८ येथे आयोजित करण्यात आला आहे.

स्वयं टॉकच्या लाईव्ह कार्यक्रमाला कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थ्यांपासून दिग्गज व्यक्तिमत्वांपर्यंत सर्वच क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. २०१४ मध्ये एक प्रयोग म्हणून सुरू झालेलं 'स्वयं टॉक्स' आता एक चळवळ बनलं आहे. या चळवळीच्या माध्यमातून समाजातील कल्पक व्यक्तिमत्वांसह यशस्वी नवउद्योजकासोबत सर्वसामान्यांचा संवाद घडवून आणला जातोय. 'स्वयं टॉक्स' कार्यक्रमातील पाहुण्यांच्या अनुभवसंपन्न माहितीने तुम्ही भारावून जाल, यात शंका नाही.

या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झाली असून मोजकेच तिकीट उपलब्ध आहेत. त्यामुळे आताच तुमचे तिकीट खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बुक करा.

बुकिंगसाठी येथे क्लिक करा : https://swayamtalks.org/swayamevent/swayam-pune-2023/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.