मुंबई: राज्यभरात उष्मा वाढल्याने अचानक परत आलेल्या पावसामुळे हंगामी आजारांसाठी पोषक वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत सोमवार (ता.७) पर्यंत स्वाइन फ्लूचे २,११३ रुग्ण आढळले असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नागपुरात सर्वाधिक २३ तर नाशिकमध्ये १९ रुग्णांचा समावेश आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरी आणि ग्रामीण भागांत स्वाइन फ्लूचे २,११३ रुग्ण आहेत. त्यापैकी ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. अवघ्या एका महिन्यात ४९६ प्रकरणे समोर आली आहेत. तसेच महिनाभरात डेंगीच्या चार हजाराने रुग्णवाढ झाली आहे.
त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले असून महाराष्ट्रात मलेरीयासाठी ८९, डेंगी आणि चिकन गुनियासाठी ५० असे एकूण १३९ सेंटिनल सेंटर कार्यान्वित केले आहेत. याचबरोबर जिल्हास्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी ४०१ वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर १,१८० गावांमध्ये औषध फवारणी, तलावांमध्ये गप्पी मासे अशा विविध उपाययोजना केल्या आहेत.
आजार - रुग्णसंख्या
डेंगी - ३,७१३
जलजन्य - ३,०६९
चिकुनगुनिया - ४,०४०
कॉलरा - ४३८
गॅस्ट्रो - ४२३
कावीळ - ४६२
लेप्टो - ७८७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.