T Raja Singh: "...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता," 400 पारच्या नाऱ्यावर काय म्हणाला भाजपचा कट्टर आमदार

Dharma Sabha Bhiwandi: या भाजप आमदाराचा जन्म 15 एप्रिल 1977 रोजी हैद्राबादच्या धुलपेट येथील लोध कुटुंबात झाला होता. धुलपेठ हे अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र मानले जाते.
T Raja Singh BJP MLA
T Raja Singh BJP MLAEsakal
Updated on

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे नुकतीच संत संमेलनासह हिंदू धर्मसभा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमासाठी तेलंगणाचे कट्टर हिंदू अशी ओळख असलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार टी. राजा सिंह हे प्रमुख पाहुणे होते.

दरम्यान या कार्यक्रमात बोलताना टी. राजा म्हणाले की, "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 पार झाला असता तर भारत आज हिंदूराष्ट्र घोषित झाले असते."

या धर्मसभेतील भाषणात टी. राजा यांनी भाजपच्या लोकसभेतील मिशन 400 पारपासून लव्ह जिहाद ,गो हत्या ,धर्मांतर यावर कायदा आदी विषयांवर भाष्य केले.

यावेळी ते म्हणाले, "जर नुकत्याच पारपडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 जागा मिळाल्या असत्या तर, मित्रांनो भारत हिंदूराष्ट्र घोषित झाला असता. महाराष्ट्रात लव्ह जिहाद ,गो हत्या ,धर्मांतर विरोधी कायदा का होत नाही? असा सवालही टी राजा यांनी उपस्तित केला."

पुढे ते म्हणाले, "येत्या काळात जर हिंदू एक झाला नाही तर भारत कधीही हिंदूराष्ट्र होऊ शकणार नाही."

T Raja Singh BJP MLA
Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

कोण आहेत टी. राजा?

टी राजा यांचा जन्म 15 एप्रिल 1977 रोजी हैद्राबादच्या धुलपेट येथील लोध कुटुंबात झाला होता. धुलपेठ हे अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र मानले जाते. धुलपेटचे लोध हे स्वतःला राजपूतांचे वंशज असल्याचा दावा करतात. टी राजा याच भागातून येतात.

टी राजा सिंग यांनी सुरुवातीला त्यांच्या घराबाहेर ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट विकण्याचा व्यवसाय केला. पुढे त्यांनी हा व्यवसाय बंद करत इलेक्ट्रिक वायरिंगचा व्यवसाय सुरू केला. मूर्ती बनवण्याचाही व्यवसाय केला.

T Raja Singh BJP MLA
Lok Sabha Speaker : भाजपचं टेन्शन वाढलं! लोकसभा अध्यक्ष पदासाठी चंद्राबाबू नायडूंची 'ही' अट; नितीश कुमारांची भूमिका काय?

100 पेक्षा अधिक गुन्हे

हे वेगवेगळे व्यवसाय करत असताना ते तेलुगु देसम पक्षाचे सदस्य झाले अन् त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. कालांतराने त्यांचा बजरंग दलाशीही संबंध आला. नंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते आमदार झाले. 2014 आणि 2018 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे.

प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, टी राजा आणि वाद यांचे जुने नाते आहे. त्यांच्यावर आतापर्यंत 100 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

टी राजा यांनी 2018 मध्ये दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्यावर 43 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 16 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.