जागेचा उतारा काढून तपासा..! सोलापुरात बनावट दस्ताद्वारे जागा हडपण्याचे प्रकार वाढले; पोलिसांत २ गुन्हे; मृत स्टॅम्प व्हेंडरसह ७ जणांवर गुन्हा

मृत असतानाही बनावट व्यक्ती उभा करून, बनावट स्वाक्षरी करून, खोटी कागदपत्रे तयार करून जागा हडपण्याचे प्रमाण सोलापूर शहरात विशेषतः: हद्दवाढ भागात वाढल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसांत सदर बझार पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
Crime
Crime esakal
Updated on

सोलापूर : मृत असतानाही बनावट व्यक्ती उभा करून, बनावट स्वाक्षरी करून, खोटी कागदपत्रे तयार करून जागा हडपण्याचे प्रमाण सोलापूर शहरात विशेषतः: हद्दवाढ भागात वाढल्याचे चित्र आहे. मागील दोन दिवसांत सदर बझार पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले असून त्यात मयत स्टॅम्प व्हेंडरसह सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

सोलापुरातील मोदी परिसरातील वडिलांच्या नावावरील जागा चौघांनी संगनमत करून हडपल्याची फिर्याद आरती रघुनाथ टंगटुरी (रा. बन्डलगुडा, तेलंगण) यांनी शनिवारी (ता. १९) सदर बझार पोलिसांत दिली. वडील अनिल अंबण्णा जक्कल यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या नावाचा १८ जून २०१३ रोजीचा स्टॅम्प उपलब्ध करून त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून इसारपावतीवरून बनावट दस्त त्या चौघांनी तयार केला.

मोदी येथील टीपी स्कीम नं. २ जुना सिटी सर्व्हे नं. ८०३४ या मिळकतीचा खरा दस्त असल्याचे भासवून इसारपावती दस्ताचा दिवाणी दावा खरा आहे म्हणून त्यांनी जागा हडपल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी मोहन हिरोमल सचदेव (रा. गुरूनानक नगर), मयत स्टॅम्प व्हेंडर एम. एम. औरंगाबादकर, साक्षीदार सिद्रमा गंगाराम कांबळे (रा. जीवन विकास नगर, कुमठा नाका) व शिवानंद बसवणप्पा हगरगुंडगी (रा. भवानी पेठ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे तपास करीत आहेत.

मूळ मालक बाजूलाच, बनावट कागदपत्राद्वारे जागेची विक्री

मंत्री हाउसिंग ॲण्ड कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे अधिकारी किशोर चंडक यांच्याकडून सज्जन विनायक कांबळे (रा. बुधवार पेठ, जय मल्हार चौक) यांनी आसरा चौकातील किल्लेदार मंगल कार्यालयामागील जागा २००२ मध्ये खरेदी केली होती. परंतु, ३१ डिसेंबर २००४ रोजी इस्माईल इब्राहिम शेख (रा. इंदिरा नगर, विजयपूर रोड) याला ती जागा विकल्याचे दाखवून दस्ताचे अनोंदणीकृत बनावट कागदपत्रे तयार करून फेर उताऱ्यावर नोंद करीत इंडेक्सवरून ती जागा झहीर नबीलाल मुल्ला यांना विकली.

त्यानंतर मुल्ला यांनी महंमद युसूफ याकुबअली उस्ताद यांना ती जागा विकली. इस्माईल शेख याने बनावट दस्त तयार करून शासनासह माझी फसवणूक केल्याची फिर्याद सज्जन कांबळे यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यावरून इस्माईल शेखसह दस्तातील साक्षीदार अब्बास अ.हमीद शेख व चंद्रकांत सिद्राम कांबळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.