Talathi Bharti 2023 Exam: तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

Talathi Bharti 2023 Exam students disrupted due to server down in Talathi recruitment exam
Talathi Bharti 2023 Exam students disrupted due to server down in Talathi recruitment exam
Updated on

मुंबई: तलाठी भरती गैरप्रकाराचे प्रकरण ताजे असताना परीक्षेच्या दरम्यान टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पहिल्या सत्रात परीक्षा होऊ शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. विरोधक सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परीक्षा घेणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले, "अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी परीक्षा नीट होऊ शकली नाही. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी."

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी परीक्षार्थींना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच, या घटनेची चौकशी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या मार्फत करणार असल्याचे जाहीर केले.

Talathi Bharti 2023 Exam students disrupted due to server down in Talathi recruitment exam
Supreme Court : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना SCचा धक्का; लोकसभा सदस्यत्व धोक्यात

"तलाठी भरती परीक्षेपासून कोणताही परिक्षार्थी वंचित राहणार नाही. यापुढील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरळीत पार पडतील,’’ आशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. (latest marathi news)

यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परीक्षा उशिरा सुरु होण्याबाबत कळविण्यात आले. टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परीक्षा ११ वाजता राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रांवर सुरु करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

Talathi Bharti 2023 Exam students disrupted due to server down in Talathi recruitment exam
Fact Check Unit: फेक न्यूज तपासण्यासाठी राज्यस्तरीय 'फॅक्ट-चेक यंत्रणा'; CM सिद्धरामय्यांचा मोठा निर्णय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.