Talathi Bharti 2023: बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ! सोशल मीडियावर व्हायरल तलाठी महाभरतीची जाहिरात बोगस?

Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023esakal
Updated on

वळसंग: सोशल मीडियावरील बोगस जाहिरातींमुळे ‘मेगा भरती, महाभरती’च्या नावाखाली नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. तलाठी भरतीची बोगस जाहिरात व्हॉट्सॲपवर प्रचंड व्हायरल झाली असून, युवकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

२०१८ पासून मेगा भरती, महाभरतीच्या नावाखाली ७५ हजार जागांचे गाजर युवकांना दाखविले जात आहे. आज भरती होईल, उद्या भरती होईल या आशेखाली लाखो युवक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. सध्या खासगी वेबसाइटवर, व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून बोगस जाहिरातींचा भडिमार सुरू असून युवकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. (Talathi Bharti 2023 Notification Viral Talathi Mahabharti advertisement on social media is Fraud)

Talathi Bharti 2023
Ncp Leader: राष्ट्रवादीला मोठा धक्का! बड्या नेत्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विमान थेट सोलापूरात

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने प्रारूप जाहिरातीचा नमुना प्रसिद्ध झाला असून, त्याद्वारे चार हजार ६२५ तलाठ्यांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

mahabhumi.gov.in या साइटवर ही जाहिरात आल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात या साइटवर उपलब्ध नाही. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात शासनाच्या वतीने प्रसिद्ध झाली नसल्याचे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

मेगा भरतीच्या नावाखाली मागील शासनाने प्रत्येक उमेदवाराकडून ३५० ते ६०० रुपये फी घेऊन कोणतीही भरती केली नाही. तसेच यावेळीही महा भरतीच्या नावाखाली ९०० ते १००० रुपये परीक्षा फी घेऊन युवकांची पिळवणूक केली जात आहे.

Talathi Bharti 2023
NCP Leader: "शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही"; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाकीत

वास्तविक पोस्ट व रेल्वे खाते, आयबीपीएस अत्यंत अल्प परीक्षांमध्ये परीक्षा घेऊन वेळेवर व नियमित नोकर भरती करीत असतात. महाराष्ट्र शासनाच्या एमपीएससीच्या परीक्षा / निकाल का वेळेवर लागत नाहीत, हेच समजत नाही.

- किरण राजगुरू, परीक्षार्थी, सोलापूर

नोकर भरतीमध्ये दहावी, बारावी परीक्षेतील गुणांचा अजिबात विचार केला जात नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण मंडळाने टायपिंगच्या परीक्षा घेतल्या असताना, पुन्हा कौशल्य चाचणी घेतली जाते, हे अन्यायकारकच आहे.

- अतुल तिकुटे, परीक्षार्थी, वळसंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.