Talathi Exam : तलाठी पेपरचे शेकडो स्क्रीनशॉट? मोठ्या रॅकेटची शक्यता

Talathi Bharti Recruitment
Talathi Bharti Recruitment esakal
Updated on

Talathi Exam : म्हसरूळ येथील तलाठी परीक्षेदरम्यान हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांच्या मूळ गावी जाऊन घरझडती घेतली आहे. परीक्षा केंद्रातून पसार झालेली युवती अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

या संशयित युवतीने तलाठी पेपरचे शेकडो स्क्रीनशॉट काढून पाठविल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, तपासी पथकाकडून या गुन्ह्याच्या तपासाने गोपनीयतेच्या नावाखाली चुप्पी साधल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ()

तलाठी पदासाठीची परीक्षा गेल्या गुरुवारी (ता. १७) झाली. नाशिकमधील म्हसरूळ केंद्रात हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी मुख्य संशयित गणेश श्‍यामसिंग गुसिंगे (२८, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) यास टॅब, मोबाईल, वॉकीटॉकी व अन्य उपकरणांसह अटक करण्यात आली. त्याचा साथीदार सचिन नायमाने व परीक्ष केंद्रातील संशयित युवती संगीता रामसिंग गुसिंगे (२१) हे दोघे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.

याप्रकरणी आयुक्तांनी तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने संशयित गणेश गुसिंगे याच्या मूळ गावी वैजापूरला जाऊन घरझडती घेतली. परंतु त्यात पोलिसांच्या हाती काय लागले, याची माहिती मिळू शकलेली नाही.

मात्र पोलिस तपासात संशयित युवती संगीताने परीक्षा केंद्रातून तलाठी पेपरचे शेकडो स्क्रीनशॉट्स गणेशला पाठविल्याचे समजते. त्यामुळे संशयित गणेश हा फक्त संगीताला कॉपी पुरवत नसावा, तर यात आणखीही काही परीक्षार्थी असावेत अथवा मोठे रॅकेट यामागे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संशयित गणेश गुसिंगे याच्याविरोधात यापूर्वीच म्हाडाचा पेपर व पिंपरी चिंचवड येथील पोलिस भरतीचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Talathi Bharti Recruitment
Talathi Exam 2023 : 'कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… यात काही काळंबेरं आहे?'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल

त्यामुळे गणेश याने आणखीही असे प्रकार केला असण्याची शक्यता असून, परजिल्ह्यातही त्याचे धागेदारे सापडण्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

संगीता सापडेना

परीक्षा केंद्रातून हायटेक तलाठी पेपर फोडणारी संशयित युवती संगीता अद्यापही पोलिसाच्या हाती लागलेली नाही. पोलिसांची वेगवेगळी पथके तिचा शोध घेत आहेत. संगीताने परीक्षा केंद्रातून पेपरचे जे स्क्रीनशॉट पाठविले, यासाठी संशयित संगीताने मोबाईल वापरला की बटण कॅमेरा वापरला, याचा उलगडा तिच्या अटकेनंतर होणार आहे.

तपासी पथकाची ‘चुप्पी’

संबंधित गुन्हा म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला, तरीही याबाबत या पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तर, सहायक आयुक्तांनी याप्रकरणी काहीही सांगण्यास नकार देत वरिष्ठांकडे बोट दाखविले. त्यामुळे पोलिसांकडून साधलेल्या चुप्पीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

"गुन्ह्यातील पसार झालेल्या संशयितांचा शोध घेतला जात आहे. मुख्य संशयितावर यापूर्वीही गुन्हे असल्याने यात आणखी कोणी आहेत का, या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे." - प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हेशाखा.

Talathi Bharti Recruitment
Talathi Exam: तलाठी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार; गोंधळानंतर महसूल मंत्र्यांचं स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.