Talathi Bharti Exam: तलाठी भरती परीक्षेचा पेपर फोडणारा आरोपीच झाला पास

Candidates alleged questions from private tuition papers were included selection test of mahajyoti
Candidates alleged questions from private tuition papers were included selection test of mahajyotiesakal
Updated on

Talathi Bharti Exam paper 2023 pass student list

मुंबई- तलाठी भरती परीक्षेचा पेपर फोडणारा आरोपीच पास झाला असल्याची माहिती मिळत आहे. आरोपीला परीक्षेमध्ये १३८ गुण मिळाले आहेत. गणेश गुसिंगे असं आरोपीचं नाव आहे. तलाठी पेपर भरती परीक्षेचा फोडल्याप्रकरणी गणेश गुसिंगे हे नाव चर्चेत आलं होतं.

नाशिकला तलाठी परीक्षेत पेपर फोडल्याप्रकरणी गणेश गुसिंगे याला ताब्यात घेण्यात आले होते. गुसिंगे याला परीक्षा केंद्राबाहेर पकडण्यात आलं होतं. त्याच्याकडे संशयास्पदरीत्या टॉकीवॉकी, हेड फोन, दोन मोबाईल आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. तसेच त्याची चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी आणखी तपास सुरु आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. गुसिंगेला १३८ गुण मिळाले असल्याने त्याची निवड होण्याचीही शक्यता आहे. गुसिंगे हा पिंपरी चिंचवड पोलिस भरती प्रकरणात फरार होता. त्यामुळे पेपर फोडणारा गुसिंगे यावर काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Candidates alleged questions from private tuition papers were included selection test of mahajyoti
Talathi Exam Copy Case : तलाठी पेपर कॉपी प्रकरणातील संशयिताच्या कोठडीत वाढ

तलाठी पदासाठीची परीक्षा गुरुवारी (ता. १७) झाली. नाशिकमधील म्हसरूळ केंद्रात हायटेक कॉपी प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी मुख्य संशयित गणेश श्‍यामसिंग गुसिंगे (२८, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर) यास टॅब, मोबाईल, वॉकीटॉकी व अन्य उपकरणांसह अटक करण्यात आली. त्याचा साथीदार सचिन नायमाने व परीक्ष केंद्रातील संशयित युवती संगीता रामसिंग गुसिंगे (२१) हे दोघे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.

Candidates alleged questions from private tuition papers were included selection test of mahajyoti
Talathi Bharti : राज्य सरकारकडून अब्जावधींची लूट; तलाठी परीक्षार्थींचा आरोप

याप्रकरणी आयुक्तांनी तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने संशयित गणेश गुसिंगे याच्या मूळ गावी वैजापूरला जाऊन घरझडती घेतली. परंतु त्यात पोलिसांच्या हाती काय लागले, याची माहिती मिळू शकलेली नाही.संशयित गणेश गुसिंगे याच्याविरोधात यापूर्वीच म्हाडाचा पेपर व पिंपरी चिंचवड येथील पोलिस भरतीचा पेपर फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र दोन वर्षांपासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.