Talathi Bharti Copy Case : वनविभागाचाही पेपर ‘गुसिंगे’ने फोडल्याची शक्यता...

talathi exam paper leak paper of forest department has also been leaked by ganesh gushinge news
talathi exam paper leak paper of forest department has also been leaked by ganesh gushinge newsesakal
Updated on

Talathi Paper Leak Case : येथील म्हसरुळ परिसरातील केंद्रावर झालेल्या तलाठी परीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य संशयित गणेश शामसिंग गुसिंगे (२८, रा. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर) याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या वनविभागातील परीक्षेचा पेपरही फोडल्याची शक्यता आहे.

यासंदर्भात वनविभागाकडे नाशिक पोलिसांकडून पाठपुरावा करण्यात आला आहे. दरम्यान, वैदयकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमइआर) घेण्यात आलेल्या परीक्षेत गुसिंगे १३८ गुण मिळवून पास झाला आहे. (talathi exam paper leak paper of forest department has also been leaked by ganesh gushinge news)

गेल्या १७ तारखेला तलाठी पदासाठी पेपर घेण्यात आला. नाशिकमधील म्हसरुळ केंद्रावर सदरचा पेपर सुरू असताना मुख्य संशयित गणेश गुसिंगे हा हायटेकरित्या परीक्षा केंद्रातील परीक्षार्थी संगीता रामसिंग गुसिंगे (२१) हिला कॉपी पुरवित होता. त्यावेळी पोलिसांनी त्यास अटक केली.

त्याच्याकडून हायटेक कॉपी प्रकरणात वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री पोलिसांच्या हाती लागली. संशयित गणेश याच्याकडील मोबाईलमध्ये अनेक पेपरचे शेकडो स्क्रिनशॉट होते. त्याचा तपास करताना त्यामध्ये वनविभागाने काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या पेपरचेही फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत.

त्यासंदर्भात तपासी पथकाने वन विभागाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. पोलिसांना वनविभागाकडून मिळणार्या प्रतिसादाची प्रतिक्षा आहे. यामुळे म्हाडा आणि पोलीस भरतीच्या पेपरफुटीसह वनविभागाच्याही पेपरफुटीमध्ये गुसिंगे याचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

talathi exam paper leak paper of forest department has also been leaked by ganesh gushinge news
Talathi Exam Copy Case : तलाठी पेपर कॉपी प्रकरणातील संशयिताच्या कोठडीत वाढ

गुसिंगे झाला पास

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमइआर) काही महिन्यांपूर्वी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत संशयित गणेश गुसिंगे १३८ गुण मिळवून पास झाला आहे. यांसंदर्भातील सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

त्यामुळे गसिंगे याने याही परीक्षेत घोळ केला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. गुसिंगे याच्याविरोधात म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचा पेपर फोडल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत.

"गुसिंगे याच्या मोबाईलमधील काही स्क्रीनशॉटमध्ये वनविभागाचा पेपर मिळाला आहे. त्यासंदर्भात वनविभागाकडे विचारणा केली असून, त्यांच्याकडून काय दुजोरा मिळतो त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल." - किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक, नाशिक.

talathi exam paper leak paper of forest department has also been leaked by ganesh gushinge news
Talathi Bharti Exam: तलाठी भरती परीक्षेचा पेपर फोडणारा आरोपीच झाला पास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.