तलाठी भरती परीक्षेत ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण कसे मिळाले? परीक्षा समन्वयकांकडून स्पष्टीकरण

दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधी तलाठी भरती परीक्षा घेण्यात आलेली होती. या २०० गुणांच्या परीक्षेमध्ये तब्बल ४८ विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
talathi exam
talathi examesakal
Updated on

मुंबईः दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधी तलाठी भरती परीक्षा घेण्यात आलेली होती. या २०० गुणांच्या परीक्षेमध्ये तब्बल ४८ विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. या प्रकरणी आता राज्य परीक्षा समन्वयकांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

TCS मार्फत तलाठी पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी तलाठी परीक्षा दिली आहे. नॉर्मलायझेशन अर्थात काठिण्य पातळीच्या माध्यमातून समानीकरण करण्याच्या पद्धतीमुळे उमेदवारांचे गुण वाढलेले आहेत. काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांच्या जास्त होऊ शकतात, असं प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलं आहे.

talathi exam
Chhagan Bhujbal : ''उरलासुरला पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही'', आव्हाडांच्या विधानावर भुजबळांची खरमरीत टीका

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होते व नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडत नाही.

talathi exam
Lek ladki yojana : लेक लाडकी योजना कागदावरच; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कमी प्रतिसाद, लाभार्थ्यांमध्ये जागृती गरजेची

थोडक्यात तलाठी भरती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली असल्याने काही शिफ्टची परीक्षा सोपी तर काहींची अवघड, कमी अधिक प्रमाणात प्रश्नांची काठिण्य पातळी बदलेली असते. त्यामुळे नॉर्मलायझेशन केलं जातं. ही प्रक्रिया केंद्रासह राज्यातील अनेक परीक्षांमध्ये राबवली जाते. त्यामुळे अवघड पेपर गेलेल्या उमेदवारांना न्याय मिळतो आणि समान गुण असलेल्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होते. त्यामुळे निवड प्रक्रिया सोपी जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.