Talathi Exam: तलाठी परीक्षा नियोजित वेळतच होणार; आयोजन संस्थेने विद्यार्थ्यांना केला मेल

राज्यात विविध संघटनांनी बंद पुकारला असला तरीही तलाठी भरतीची परीक्षा नियोजित वेळतच होणार असल्याची माहिती परीक्षेचे आयोजन करणाऱ्या संस्थेने दिले आहे
Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023esakal
Updated on

जालन्यातील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असून अनेक ठिकाणी मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. तर परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची भूमिका सकल मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. परीक्षार्थींसाठी रिक्षा सुरू राहतील. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज तलाठी भरतीचा पेपर आहे. परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पेपरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्यात विविध संघटनांनी बंद पुकारला असला तरीही तलाठी भरतीची परीक्षा नियोजित वेळतच होणार असल्याची माहिती परीक्षेचे आयोजन करणाऱ्या संस्थेने दिले आहे. विद्यार्थ्यांनी योग्य खबरदारी घेऊन वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं, असं आवाहनही आयोजक संस्थेकडून करण्यात आलं आहे. यासंदर्भातील एक मेल सर्व परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

Talathi Bharti 2023
Sharad Pawar: 'शरद पवार यांच्याशी माझा आजही फोनवर संपर्क', अजित पवार गटाच्या नेत्याच्या दाव्याने भुवया उंचावल्या

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध संघटनांनी आज (सोमवारी) बंद पुकारला आहे. त्यामुळे वाहतूकीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असून तलाठी परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

तर महसूल परीक्षा केंद्रावर पोहचण्याची मुलांची संधी हुकली, तर त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, मागणी राज्यातील अनेक नेत्यांनी केली आहे. दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

Talathi Bharti 2023
Weather Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.