Pankaja Munde: मुंडे बंधू-भगिनी एकत्र येणार? भविष्यात काहीही होऊ शकते...; पंकजांचे सूचक विधान

Pankaja Munde
Pankaja Munde esakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: कधीकाळी एकमेकांविरोधात टीका करण्याची एकही संधी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सोडत नव्हते. मात्र, सध्या राजकीय वर्तुळात मुंडे बंधू-भगिनी एकत्र येणार असल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान, बुधवारी (ता.२१) योग दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. याच विषयावर माध्यमांनी विचारल्यानंतर ‘भविष्यात काहीही होऊ शकते’, असे सूचक विधान त्यांनी केले.

छत्रपती संभाजीनगरात सर्व बालगृहातील बालकांसमवेत विभागीय क्रीडा संकुलावर सकाळी आयोजित उपक्रमात पंकजा मुंडे यांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Pankaja Munde
Gondia: कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई; अनेक त्रुट्या आढळल्याने जिल्ह्यातील ४३ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

परळी विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र येणार का? याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला कारण म्हणजे परळीचा वैद्यनाथ कारखाना. परळीचा कारखाना बहीण-भावाने एकत्र येऊन बिनविरोध केला.

कारखाना, शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आल्याचे पंकजा म्हणाल्या. आता कारखान्यात दाखवलेली एकी भविष्यात राजकारणातही दाखवणार का, हा प्रश्न पंकजा यांना विचारला असता, त्या म्हणाल्या, ‘‘भविष्यात काहीही होऊ शकतं.’’

धनंजय ज्यावेळेस विधान परिषदेवर आमदार झाले, त्यावेळी मी स्वतः त्यांच्या सत्काराला हजर असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. शिवाय पातळी सोडून कधी टीका केली नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसले. तिथे कटुता दूर झाल्याची सर्वत्र चर्चाही झाली. धनंजय आजारी असताना पंकजा त्यांची भेट घ्यायला गेल्या.

त्यामुळे कारखान्यात जुळलेले सूर आणि आज केलेल्या सूचक विधानामुळे भविष्यात बहीण-भाऊ एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, राम बुधवंत यांची उपस्थिती होती.

Pankaja Munde
Ahmednagar: बेरोजगारीचा उच्चांक! कंत्राटी आरोग्यसेवेच्या भरतीसाठीही अर्जांचा पाऊस; आज मुलाखती

मला बोलायचे तेव्हाच बोलेल!

पक्षातील कोंडीमुळे काही वर्षांपासून अस्वस्थ असलेल्या पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी अनेक कार्यक्रमांतून बोलूनही दाखवली.

नुकताच दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘मी भाजपची; परंतु भाजप माझ्या एकटीचा थोडीच,’ असा सूर काढला होता. याविषयी विचारले असता पंकजा म्हणाल्या, की मला जे बोलायचे तेव्हाच बोलेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.