Cyclone Tauktae : मुंबईवर परिणाम, जुन्नर मध्ये इशारा

अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळाने भीषण रुप धारण केले असून हे वादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. रविवारी गोवा, कोकण या भागांना वादळाचा तडाखा बसला.
Cyclone Tauktae
Cyclone Tauktaegoogle
Updated on

Tauktae Cyclone Updates : केरळ, कर्नाटकपाठोपाठ तौत्के चक्रीवादळाचा तडाखा अखेर रविवारी महाराष्ट्र, गोवा या राज्यांना बसला. अमळनेर तालुक्यात वादळामुळे झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणींचा मृत्यू झाला असून गोव्यातही दोन जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे संभाव्य धोका लक्षात घेत राजापूर तालुक्यात प्रशासनाने किनाऱ्यावरील आंबोलगड, माडबन, सागवे, अवळीची वाडी येथील काही घरांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. (tauktae cyclone updates Mumbai Maharashtra Gujarat imd)

अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रीवादळाने भीषण रुप धारण केले असून हे वादळ गुजरातच्या दिशेने जात आहे. रविवारी गोवा, कोकण या भागांना वादळाचा तडाखा बसला. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासूनच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबई जाणवू लागला. वादळ पुढे सरकेल तसे मुंबईत जोरदार वारे देखील बघू शकतील असा इशारा हवामान खात्यानं दिला.

Cyclone Tauktae
कोरोनाग्रस्त चिमुकल्याचा मृतदेह सोडून पळाले आई-वडील

पुणे आणि लगतच्या भागातही वादळाचा परिणाम जाणवू शकतो. भोर तालुक्यानंतर वेल्हा-मुळशी तालुक्यांत रात्री अंदाजे दहा ते सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत व नंतर जुन्नर तालुक्यात सोमवारी सायंकाळपर्यंत या वादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.याबाबत गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

दरम्यान, वादळच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा राज्यात तौक्ते वादळामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर गोव्यात वादळाच्या तडाख्यात ५०० झाडं उन्मळून पडली. सुमारे १०० मोठ्या घरांचे आणि १०० छोट्या घरांचे नुकसान झाले. रस्ते बंद झाले आहेत. वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला होता. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.