पुरस्कार विजेते डिसले गुरुजी पुन्हा वादात; RTI कार्यकर्त्याचा आक्षेप!

शिक्षण विभागाला न कळवताच डिसले गुरुजींनी परदेशात प्रवास केल्याच्या आरोपांमुळं ते चर्चेत आले होते.
डिसले गुरुजीं
डिसले गुरुजींesakal
Updated on

बार्शी : ग्लोबल टिचर पुरस्काराने सन्मानित शिक्षक रणजितसिंह डिसले हे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. त्यांच्यावर बार्शी येथील एका RTI कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांनी आक्षेप घेतला आहे. डिसले गुरुजींना मिळालेल्या पुरस्काराची सरकार दरबारी नोंदच नसल्याचं काटकर यांनी म्हटलं आहे. (Award winner teacher RanjeetSingh Disale again in controversy RTI activist Dinanath Katkar takes objection)

डिसले गुरुजीं
UP Election : आझम खान यांची अंतरिम जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव

डिसले गुरुजींना मिळालेल्या पुरस्काराची सत्यता शालेय शिक्षण विभागानं तपासली का? याबाबत माहितीचा अर्ज केला तरी माहिती मिळाली नसल्याचा दावा काटकर यांनी केला आहे. डिसले गुरुजी यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत सरकार दरबारी माहितीच उपलब्ध नाही. RTI मधून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत माहीती मागवली होती. त्याला शिक्षण विभागाकडून उत्तर मिळू शकले नाही, असं काटकर यांनी म्हटलं आहे.

डिसले गुरुजीं
महात्मा गांधींचं आवडत गीत बीटिंग रिट्रिटमधून हटवलं!

शिक्षण विभागाला न कळवताच परदेश प्रवासाचा आरोप

वेळापूर येथे प्रतिनियुक्तीवर असताना डिसले यांनी शिक्षण विभागाला न कळवता परदेशात प्रवास केल्याचा तसेच या कालावधीतील वेतन मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी केला होता. तसेच मागील चार वर्षात डिसले गुरुजी शाळेत उपस्थित होते का? असा सवाल विचारण्यात येत होता. या प्रकारामुळं डिसले गुरुजी चर्चेत आले होते.

परदेश प्रवासाचा मार्ग मोकळा

अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी डिसले गुरुजींनी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात मागील महिन्यात २१ डिसेंबर रोजी अध्ययन रजेचा अर्ज दिला होता. मात्र, अध्ययनासाठी मागितलेली प्रदीर्घ रजा प्रलंबित ठेवण्यात आली होती. अध्ययनासाठी मागितलेली त्यांची रजा प्रलंबित ठेवल्याने सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजीचे सूर उमटलेले दिसून आले. यानंतर या प्रकरणाची तातडीनं दखल घेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा मार्ग मोकळा केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रजा मंजूर करण्याबाबत निर्देश दिले. स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.