विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचं फार महत्त्व असतं. कारण, एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ज्ञान देऊन, त्यांची काळजी घेऊन आणि त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक मजबूत आकार देतो. तसेच विद्यार्थ्याला शिक्षण देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतो. म्हणून, विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात आई–वडिलांनंतर केवळ 'शिक्षक'च महत्वाची भूमिका निभावतात. 'भारतीय संस्कृती' ही आदर्श संस्काराची शिदोरी आहे. यामध्ये गुरुंचा सन्मान अग्रभागी आहे. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच विद्यार्थ्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळतेय. डॉ. राधाकृष्ण (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचे शिक्षकांप्रती असलेलं प्रेम व आदर पाहून भारत सरकारनं त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' (Teachers Day) म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला.
विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात आई–वडिलांनंतर केवळ 'शिक्षक'च महत्वाची भूमिका निभावतात.
जन्म (Birth) : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी दक्षिण भारतातील तिरुमणी (तामिळनाडू) या छोट्याशा गावात ब्राह्मण कुटुंबात (Brahmin Family) झाला. हे गाव चेन्नई शहरापासून ईशान्येला 64 किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांच्या वडिलांचं नाव सर्वपल्ली वीरास्वामी, तर आईचं नाव सीताम्मा होतं. सर्वपल्ली वीरास्वामी हे गरीब असूनही विद्वान ब्राह्मण होते. ते राज्याच्या महसूल विभागात कार्यरत होते. त्यांना पाच मुलं व एक मुलगी होती. राधाकृष्णन या अपत्यामध्ये दुसरे अपत्य होते. राधाकृष्णन यांच्या काळात कमी वयात लग्न केलं जायचं. त्यामुळे 1903 साली 16 वर्षाच्या वयात त्यांचं लग्न शिवकमुशी करण्यात आलं. शिवकमुशीचे वडील हे त्यांच्या दूरच्या नात्यातील नातेवाईक होते. 1908 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. राधाकृष्णन यांच्या पत्नीचं 1956 मध्ये निधन झालं.
शिक्षण (Education) : राधाकृष्णनन यांचं बालपण तिरुमणी गावातच गेलं. तेथूनच त्यांनी प्राथमिक शिक्षण प्राप्त केलं. पुढील शिक्षण त्यांनी ख्रिश्चन मिशनरी संस्था लुथर्न मिशन स्कूल, तिरुपती येथे सन 1896 पासून 1900 पर्यंत मिळवले, तर 1900 मध्ये राधाकृष्णन यांनी वेल्लूरमधील कॉलेजमधून शिक्षण ग्रहण केलं. त्यानंतर मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. सन 1906 मध्ये त्यांनी दर्शन शास्त्रात MA केलं. डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून अनुक्रमे मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये 1918-1921 दरम्यान काम केलं. म्हैसूर विद्यापीठानं राधाकृष्णन यांचा तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून गौरव केला. 1921-1931 या दरम्यान कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. राधाकृष्णन 1931-1936 मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. 1939 मध्ये पंडित मदन मोहन मालविय यांच्या विनंतीवरून त्यांनी बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्र हाती घेतले. ते 1948 पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू राहिले. ऑक्सफर्ड विद्यापीठात दरवर्षातून काही महिने अशाप्रकारे 20 वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केलं.
राजकीय कारकीर्द (Political Career) : डॉ. राधाकृष्णन यांनी शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यश मिळवल्यानंतर, त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. 1947 मध्ये आपला देश ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तावडीतून स्वतंत्र झाला, त्यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी खास राजदूत म्हणून सोव्हिएत युनियनबरोबर मुत्सद्दी काम करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर त्यांनी पंडित नेहरूंना स्वीकारलं आणि 1949 पर्यंत सुमारे 2 वर्षे निर्मात सभेचे सदस्य म्हणून काम केलं. 1952 मध्ये सोव्हिएत युनियनच्या स्थापनेनंतर (स्वातंत्र्यानंतरच्या 10 वर्षांनंतर) आपल्या देशाच्या घटनेत उपराष्ट्रपती पदाची नवीन पदे तयार केली गेली. त्यात राधाकृष्णन हे पहिल्या पदावर होते. त्यानंतर 13 मे 1962 रोजी डॉ. राधाकृष्णन यांची स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. देशाचे सर्वोच्च पद सांभाळताना त्यांनी सुमारे 1967 पर्यंत काम केलं. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांना अनेक चढउतारांना सामोरे जावं लागलं. 1967 मध्ये राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर, ते मद्रासमध्येच स्थायिक झाले.
पुरस्कार (Awards) :
1954 : डॉ. राधाकृष्णन यांचा देशातील सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न पुरस्कारा'ने सन्मान
1954 : राधाकृष्णन यांना 'जर्मन ऑर्डर पौल ले मेरिट फॉर आर्ट्स अँड सायन्स' पुरस्कार
1961 : जर्मन पुस्तक व्यापारातील 'शांतता पुरस्कार' प्रदान
1962 : देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती
1963 : राधाकृष्णन यांचा ब्रिटीश ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मान
1913 : ब्रिटीश सरकारकडून राधाकृष्णन यांचा 'सर' पदवीने गौरव
1938 : राधाकृष्णन यांची ब्रिटीश अॅकॅडमीचे सदस्य म्हणून नियुक्ती
1975 : अमेरिकन सरकारकडून टेम्पलेट्स बक्षीस
1968 : राधाकृष्णन यांना साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान
1968 : राधाकृष्णन यांच्या नावे ऑक्सफोर्ड विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती
राधाकृष्णन यांची ग्रंथ संपदा (Radhakrishnan Books)
1908 : द एथिक्स ऑफ वेदांत अॅण्ड इट्स मेटॉफिझिकल प्रीसपोझिशन्स
1918 : द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर
1920 : द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी
1926 : द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ
1927 : इंडियन फिलॉसॉफी
1929 : ॲन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ
1933 ईस्ट अॅण्ड वेस्ट इन रिलिजन
1939 : ईस्टर्न रिलिजन्स अॅण्ड वेस्टर्न थॉट
1948 : भगवद्गीता
1950 : द धम्मपद
1953 : प्रिन्सिपल उपनिषद्स
1955 : द रिकव्हरी ऑफ फेथ
1960 : ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज)
(या लेखात विकीपीडियासह अन्य माध्यमांचा संदर्भ घेण्यात आला आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.