आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने पक्ष उतरणार असून, आमची कोणाशीही युती नाही.
सातारा : महाराष्ट्रात सिंचनाच्या सोयी उपलब्ध असतानाही दुर्दैवाने शेतीमालाला भाव मिळत नाही. मात्र, तेलंगणसारखे नऊ वर्षांपूर्वी स्थापन झालेले राज्य जिथे २४ तास मोफत वीज दिली जाते. महाराष्ट्रात भारतीय राष्ट्र किसान समितीच्या वतीने विकासाचा तेलंगण (Telangana) पॅटर्न राबविला जाणार आहे.
विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत पक्षाचे काम सुरू आहे. सातारा जिल्ह्यातही पक्षाचे काम सुरू असून, संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेलंगणच्या विकासाचे रोल मॉडेल घराघरांत पोचविले जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २० ते ३० हजार सभासद नोंदणी झाली आहे, अशी माहिती तेलंगण भारत राष्ट्र समितीचे (Bharat Rashtra Samithi) प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम (Manikrao Kadam) यांनी दिली.
कदम यांनी शासकीय विश्रामगृहात तेलंगणच्या विकास मॉडेलसंदर्भात काल पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी समन्वय समितीचे विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप साबळे, महिला आघाडीच्या वैजयंती कदम व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व समितीचे जिल्हा संघटक शंकरराव गोडसे उपस्थित होते.
कदम म्हणाले, 'महाराष्ट्रात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या गोष्टी होताना दिसत नाहीत. तेलंगण राज्यात के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली जलऊर्जा, सौरऊर्जा, औष्णिक ऊर्जा या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. शेतीला चोवीस तास मोफत वीज, सात हजार शेतीमाल खरेदी केंद्रे, यासाठी शासनाने पाच लाख कोटी रुपये खर्च केला आहे. मेंढपाळांना ७५ टक्के अनुदान देऊन मेंढ्या पुरवल्या जातात.'
'तसेच वृद्धांना तीन हजार रुपये मदत, शेतकऱ्याला दहा हजार रुपये एकरी अनुदान दिले जाते. या तेलंगण मॉडेलचा महाराष्ट्रात प्रसार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय किसान समिती सक्रिय झाली असून, राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांत संपर्क संवाद यात्रा सुरू आहे. आत्तापर्यंत पक्षाकडे दोन लाख तीस हजार सभासदांची नोंदणी झाली आहे. सातारा जिल्ह्यातही पक्षाचे काम सुरू असून, जिल्ह्यामध्ये तेलंगणच्या विकासाचे रोल मॉडेल घराघरांत पोचविले जाणार आहे.'
आतापर्यंत जिल्ह्यात २० ते ३० हजार सभासद नोंदणी झाली आहे. या माध्यमातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने पक्ष उतरणार असून, आमची कोणाशीही युती नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य मतदारांना बरोबर घेऊनच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडविण्याचे बीआरएस समिती प्रयत्न करत आहे, असंही कदम यांनी सांगितलं.
तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांच्या माध्यमातून भारत राष्ट्र समिती सातारा लोकसभा (Satara Lok Sabha Election) लढणार आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याविरोधात समितीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.