गोष्टी खोट्या पद्धतीनं सांगण्याचा उद्योग बंद व्हायला हवा - मुख्यमंत्री

देशातील सुडाचं राजकारण संपलं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray
Updated on

मुंबई : तुम्ही न केलेल्या गोष्टी खोट्या पद्धतीनं सांगणं हा कारभार मोडायला हवा, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar rao) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केलं. देशातील सुडाचं राजकारण संपलं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (telling things in wrong way should be stopped now says CM Uddhav Thackeray)

CM Uddhav Thackeray
महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा यशस्वी होतोच; केसीआर यांचा इशारा

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार आहोत, अशा बातम्या येत होत्या तो योग आज आला. शिवजयंतीनंतर दुसऱ्याच दिवशी आमची भेट झाली. देशात दिवसागणिक वातावरण गढूळ होत चाललंय राज्य कारभार दूर राहिला पण सुडाचं राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर चाललं आहे. सुडाचं राजकारण ही आपल्या देशाची परंपरा नाही. सुडाचं राजकारणं हे तर आमचं हिंदुत्व आजिबात नाही.

CM Uddhav Thackeray
मतविभाजन हाच 'एमआयएम'चा डाव! महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाचे अध्यक्षांची टीका

हे जर असचं सुरु राहिलं तर देशाचं भविष्य काय? जे आहे ते मागील पानावरुन पुढे चालू ठेवायचं असेल तर मग मुख्यमंत्री कोणं होईल, पंतप्रधानपदी कोण बसेल हे महत्वाचं नाही. पण देशाचा विचार कोणीतरी करायला हवा याला आम्ही आजपासून सुरुवात केली आहे. आम्हाला याचा नव्यानं साक्षात्कार झालाय असंही नाही. पण सुरुवात कोणीतरी करायला हवी ती आम्ही करतोय, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

CM Uddhav Thackeray
आठवले म्हणाले, चंद्रशेखर राव यांना सगळ्यांना भेटण्याचा अधिकार; पण...

संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरलेत. तेलंगणा-महाराष्ट्राची सीमा हजार किमीची असल्यानं आम्ही सख्खे शेजारी आहोत. नाहीतर प्रत्येकजण एक काहीतरी इरादा घेऊन पुढे चाललाय. राज्य गेलं खड्यात, देश गेला खड्ड्यात, अशी सध्या स्थिती आहे. आता देशात नव्या विचारांची सुरुवात झाली आहे. हा विचार पुढे न्यायाला थोडा वेळ लागेल आणि प्रयत्नांची एकदा सुरुवात केल्यानंतर मेहनत तर करावी लागणार. शेवटी देशाचे मुलभूत प्रश्नांना हात घालण्याऐवजी दुसऱ्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तुम्ही नाही केलं हे देखील खोट्या पद्धतीनं सांगायचा कारभार मोडायला पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.