सोलापूर : कोरोनाच्या संकटाशी सामना करतानाही राज्यातील सर्वसामान्यांनी विशेषत: महिलांनी ‘जनधन’च्या माध्यमातून दहा हजार ६१ कोटींची बचत केल्याची बाब समोर आली आहे. २०१९-२० च्या तुलनेत सध्या जनधन खात्यात तब्बल दोन हजार ५७५ कोटींची रक्कम वाढली आहे. ठाणे, पुणे, वाशिम, नगर, बीड, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यांमधील खात्यात सर्वाधिक रक्कम जमा आहे.
बॅंकिंग व्यवहारापासून वर्षानुवर्षे दूर राहिलेल्यांना विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लागावी, बॅंकिंग व्यवहार त्यांनाही समजावेत, त्यांच्यात वित्तीय साक्षरता यावी, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री अपघात विमा योजनांसह अन्य शासकीय योजनांचा लाभ त्यांना बॅंकांच्या माध्यमातून थेट मिळावा, या हेतूने १५ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना सुरु केली. मागील साडेसात वर्षांत राज्यातील तीन कोटी नऊ लाख ९६ हजार ५०० व्यक्तींनी खून्य रूपयात जनधन खाती उघडली आहेत. केंद्र असो वा राज्य सरकारच्या योजनांचा डीबीटीद्वारे (डायरेक्ट बेनिफिट ट्रानस्फर) त्या व्यक्तींना अनुदानाच्या स्वरुपात लाभ मिळू लागला आहे. काहींना पंतप्रधान मोदी हे आपल्या खात्यात १५ लाख रुपये टाकतील, अशीही आशा आहे. सध्या पुरुषांच्या तुलनेत महिलांचीच खाती या जनधनमध्ये अधिक आहेत. विशेष बाब म्हणजे मार्च २०२० मध्ये राज्यातील पावणेतीन कोटी जनधन खात्यात सात हजार ४६४ कोटी रुपये होते. राज्यात कोरोना असतानाही मार्च २०२१ मध्ये ही रक्कम दहा हजार ६७ कोटींवर पोहचली. आता राज्यातील जनधन खात्यात जवळपास दहा हजार १०० कोटींपर्यंत ही रक्कम पोहचल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आले आहे.
‘जनधन’ची तीन वर्षातील स्थिती...
(२०१९-२०)
एकूण बॅंक खाती
२,७०,२५,०६२
जनधन खात्यातील रक्कम
७,४६६..३४ कोटी
---
(२०२०-२१)
बॅंक खात्यांची संख्या
२,९९,६८,८०५
खात्यावरील रक्कम
१०,०६७.२१ कोटी
---
(२०२१-२२)
जनधनमधून उघडलेली खाती
३,०९,९६,५००
बॅंक खात्यातील रक्कम
१०,०९१.५८ कोटी
ठळक बाबी...
- जनधनमध्ये १.३२ कोटी पुरुषांची तर १.६३ कोटी महिलांची बॅंक खाती
- जनधनच्या तीन कोटीं बॅंक खात्यांपैकी ३५ लाख खात्यात शून्य बॅलन्स
- राज्यात तीन वर्षांत जनधन खात्यात ३१.०९ लाखांची वाढ
- जनधन खात्यात ठेवावा लागत नाही मिनिमम बॅलन्स, बॅंकांकडून आकारला जात नाही दंड
- महिन्याला दहा हजार तर वर्षात ५० हजारांचीच रक्कम काढता येते
- जनधन खाते उघडल्यानंतर सहा महिन्यांनी खातेदाराला मिळते बिनव्याजी पाच हजारांचे कर्ज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.