टीईटी गैरव्यवहार : सुपेचा ड्रायव्हर पाठवायचा आरोपींना विद्यार्थ्यांची नावे

घोलप याने २०२० मधील टीईटीमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे.
TET Exam Fraud
TET Exam FraudSakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त नामदेव तुकाराम सुपे (Namdeo Supe) याने पाठविलेली विद्यार्थ्यांची नावे व हॉलतिकिट त्याच्या कार्यालयीन गाडीवर चालक असलेला सुनील घोलप (Sunil Gholap) इतर आरोपींना पाठवत असल्याचे पोलिस तपासातून (Police Investigation) निष्पन्न झाले आहे. घोलप यासह मनोज शिवाजी डोंगरे यास सायबर पोलिसांनी (Cyber Police) अटक केली आहे.

घोलप याने २०२० मधील टीईटीमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांचे हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉटस्अपवर पाठवीत. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवीत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे, घोलप याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून व्हॉटस्अप चॅटिंग बाबत पुरावा हस्तगत करायचा आहे.

TET Exam Fraud
मुक्कामाचे ठिकाण असलेले कारगिल झालंय पर्यटनस्थळ : फिरोज खान

घोलप याने स्वतंत्ररीत्या विद्यार्थ्यांची नावे त्याच्या साथीदाराला पाठविली आहेत. तर, डोंगरे हा सुपे व शिक्षण विभागात खासगी कंपनीचा तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत असणारा अभिषेक अजय सावरीकर या दोघांच्या संपर्कात होता, अशी माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. डोंगरे याला तीन लाख २५ हजार रुपये मिळाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी अ‍ॅड. जाधव यांनी केली. न्यायालयाने त्यांना तीन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने तुकाराम सुपे व अभिषेक सावरीकर यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप यांचे तांत्रिक विश्लेषण करून डिजिटल पुरावा मिळवायचा आहे.

TET Exam Fraud
शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव ढमढेरेची तनिष्का गायकवाड राज्यात प्रथम

आरोपींविरोधात आणखी पुरावे मिळवून त्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करायचे असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. जाधव यांनी केला. बचावपक्षातर्फे अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. योगेश पवार, अ‍ॅड. विश्वास खराबे यांनी कामकाज पाहिले. तपास अधिकाऱ्यांना तपासाच्या दृष्टीने आवश्यक सर्व गोष्टी देण्यात आल्या असून तपास पूर्ण झाला आहे. पोलिस कोठडी दरम्यान सुपे यांनी पोलिसांना सहकार्य केले असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. पवार यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत सुपे व सावरीकर याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()