Apmc Election Result: गद्दार आमदारांचा शेतकऱ्यांनी करेक्ट कार्यक्रम केला; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

Apmc Election Result
Apmc Election Resultesakal
Updated on

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. 147 बाजार समित्यांच्या जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली होती. निवडणुकीचा शनिवारी निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत धक्का बसलेल्यांमध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे.

तर शिवसेना-भाजपला शेतकऱ्यांनी नाकारल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सर्वात जास्त बाजार समित्यांवर झेंडा फडकला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत निकालावर प्रतिक्रिया दिली.

Apmc Election Result
Sushma Andhare: 'अमित शाहांनी सारखं-सारखं अप-डाऊन करू नये, त्यांनी…',मुंबई दौऱ्यावरून अंधारेंची खोचक टीका!

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेसह महविकास आघाडीस उत्तम यश मिळाले. गद्दार आमदारांचा शेतकरी मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केलं.हेच महाराष्ट्राचे जनमानस आहे. ही सुरुवात आहे.. महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत असाच जोरदार कार्यक्रम होईल.लोकांनी खोके लाथाडले .हे स्पष्ट दिसते. हिम्मत असेल तर महानगर पालिका निवडणुका घेऊन दाखवा!"

Apmc Election Result
Weather Update: IMD कडून 5 दिवसांसाठी राज्याला गंभीर इशारा; ऑरेंज अलर्ट

दरम्यान राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना मंत्र्यांना जबर धक्का बसला आहे. यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना होम पीचवरच मोठा धक्क बसला आहे. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे.

या निवडणुकीत सोसायटी गटातून अकरा पैकी दहा जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांना मोठा झटका बसला आहे. तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना देखील जबर धक्का बसला आहे. तसेच मंत्री संजय राठोड अशा अनेक दिग्गज मंत्र्यांना शेतकऱ्यांनी नाकारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.