Sushma Andhare Vs Nitesh Rane: प्रिय नितू... तुझा अभ्यास फारच कच्चा आहे; सुषमा अंधारेंचं नितेश राणेंना पत्र

Sushma Andhare Vs Nitesh Rane
Sushma Andhare Vs Nitesh Raneesakal
Updated on

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांना सोशल मीडियावर एक पत्र लिहिलं आहे. राणेंच्या पूर्वीच्या भूमिका आणि आज बदललेल्या भूमिका यावरुन अंधारेंनी त्यांना चिमटे काढलेले आहे.

सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करुन लिहिलेलं पत्र जशास तसं...

प्रिय नीतू

बाळा,

तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्क ची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरा पट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास.

पण पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या-कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सह 2015 सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस किंवा गाणं सम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही.

मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे . भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या भावाचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच.

तुझी आत्या

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

दरम्यान, सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हीडिओ नितेश राणे यांनी ट्विट केला होता. त्यामध्ये सुषमा अंधारे ह्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल टीकात्मक बोलत आहेत. त्या व्हीडिओला उत्तर म्हणून सुषमा अंधारे यांनी हे पत्र नितेश यांना लिहिले असून त्यासोबत नितेश राणेंच्या जुन्या-नव्या वक्तव्यांचा व्हीडिओदेखील शेअर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.