Shivsena MLA Disqualification : उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्ट दिलासा देणार? नार्वेकरांच्या निकालाविरोधीत आज मागणार दाद

काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court Sakal Digita
Updated on

नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना पात्र ठरवण्यात आले. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता ठाकरे गटाकडून याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळ सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असल्याचं ठाकरे गटाच मत आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court
Mumbai News : पोलीस शिपायाने हॉस्पिटलच्या टॉयलेटमधून उडी मारत संपवलं जीवन; घटनेने उडाली खळबळ

राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालात एकनाथ शिंदे यांचा गटच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल दिली आहे. तसेच नार्वेकरांनी भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती देखील वैध असल्याचे म्हटले. या प्रकरणातील मुख्य याचिका होते त्या अपात्रतच्या प्रकरणात नार्वेकरांनी कोणालाच अपात्र केले नाही. त्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे अशा दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवण्यात आले. तसेच एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवडही वैध ठरवण्यात आली. विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटविण्याचा अधिकार उद्धव ठाकरे गटाकडे नसल्याचे देखील निकालात सांगण्यात आले.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court
Ram Mandir : २२ जानेवारीला राम येणार नाहीत, स्वतः माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं; बिहारच्या मंत्र्याचं विधान

दरम्यान या निकालावर ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यता आली होती. आता ठाकरेंकडे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक आहे. यासाठी आज याचिका दाखल केली जाणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.