Shivsena: ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण Video Viral

ठाकरे गटाचा कार्यकर्त्या रोशनी शिंदेंना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली
Shivsena
ShivsenaEsakal
Updated on

राज्यात सत्तांतर शिवसेनेतील फुटीनंतर अनेक महिने होऊन गेले तरी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये धुसपूस अजूनही सुरुच आहे. कार्यकर्तेही एकमेकांविरुद्ध आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. कारण ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

ठाण्यातील कासारवडवली येथे ही घटना घडली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काल (सोमवारी) (3 एप्रिल) संध्याकाळच्या सुमारास शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रोशनी शिंदे यांनी दिलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटलं आहे की, मी टाटा मोटर्स कासारवडवली येथे माझ्या ऑफिसमध्ये कामावर असताना कामावर सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर 15 महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली असं त्यांनी म्हंटलं आहे.

Shivsena
Weather update: दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; अलर्ट जारी

त्यांनी पुढे अर्जात म्हंटलं आहे की, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची युवती सेना म्हणून काम करत आहे. पक्षाच्या प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले होते. परंतु दत्ताराम गवस यांनी माझ्यावर वैयक्तिक कमेंट केली. त्यावेळी मी त्यांना प्रत्युत्तर दिलं. जे मी अर्जासोबत जोडलेलं आहे.

Shivsena
Shiv Sena News : शिवसेना शिंदे गटाची कोंडी फुटली; जम्बो कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांना कामाचे बळ

मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पत्नीचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले होते. यासंदर्भात माझी चूक नसताना आणि मला भांडण वाढवायचे नव्हते म्हणून सॉरीची पोस्ट केली होती. असं असताना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये काही महिला एकत्र घुसून माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्काळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती रोशनी शिंदे यांनी केली आहे.

Shivsena
Nagar Kalyan Highway Accident: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; ३ ठार, १ जण गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.