Shivsena UBT: उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं! लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे अॅक्शन मोडवर
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आता नवी रचना, शिवसेना ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिर घेतलं जाणार आहे. तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहे.
संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाची नवी रचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी ठाकरे गटाकडून विभागीय नेत्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे.
उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी नेते मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवली आहे. आता नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचे पाऊल टाकलं आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी १० नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
ठाकरे गटाचं जानेवारीत राज्यव्यापी शिबीर
आगामी निवडणुकांची तयारी व महाराष्ट्रासह दिल्लीत 'बदल' घडविण्याची तयारी म्हणून जानेवारीत ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर आयोजित केलं आहे. याशिवाय जाहीर सभा व शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची आणि सभांबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी?
संजय राऊत- उत्तर महाराष्ट्र आणि पुणे
लोकसभा मतदारसंघ - नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिडीं, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)
अनंत गीते - कोकण (रायगड)
लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा - पनवेल, कर्जत, उरण)
चंद्रकांत खैरे: मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना
खासदार अरविंद सावंत- पश्चिम विदर्भ
लोकसभा मतदारसंघ: बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ - वाशिम, वर्धा
खासदार अनिल देसाई: पश्चिम महाराष्ट्र
लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी
आमदार भास्कर जाधव: पूर्व विदर्भ
लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर
खासदार विनायक राऊत: कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
लोकसभा मतदारसंघ: रत्नागिरी, सिंधुदुर्ग
खासदार राजन विचारे: कोकण (ठाणे, पालघर)
लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर
आमदार रवींद्र वायकर : मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ: नांदेड, हिंगोली, परभणी
आमदार सुनील प्रभू : मराठवाडा, सोलापूर
लोकसभा मतदारसंघ: सोलापूर ,धाराशिव, लातूर, बीड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.