Shivsena: रेड्याकडून दुधाची अपेक्षा…; ठाकरे गटाच्या नेत्याकडून थेट राज्य सरकारला रेड्याची उपमा

गौरव यात्रेवरून ठाकरे गटाच्या खासदाराने शिंदे गटाला डिवचलं आहे
Shivsena
ShivsenaEsakal
Updated on

भाजप आणि शिवसेनेने सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या गौरव यात्रेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे विज्ञानवादी होते. त्यांना दाढी वगैरे आवडत नव्हती. त्यामुळे शिंदे आता दाढी काढणार आहेत काय? असा प्रश्नही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना केला आहे. तसेच मला अजूनही संरक्षण मिळालेलं नाही. सरकारकडून अपेक्षा नाही. रेड्याकडून दुधाची अपेक्षा काय करणार? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊतांशी पत्रकारांनी संवाद साधला. तुम्हाला काल जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर तुमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे काय? असा सवाल पत्रकारांनी संजय राऊत यांना केला. त्यावर सुरक्षा व्यवस्था वाढवली नाही. आम्ही मागितली नाही. सरकारविरोधकांच्या जीवाच्या बाबत अत्यंत बेफिकीर आहे. असायला हरकत नाही. कारण या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणं म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Shivsena
Sharad Pawar: शरद पवारांना अभिप्रेत राज्य कारभार लवकरच दिसेल, भाजप नेत्याचं मोठं विधान

सावरकर गौरव यात्रेवर बोलताना म्हणाले कि, सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नसे. आता शिंदे दाढी कापणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं दाढी वाढवणं आपल्या धर्मात बसत नाही. व्यवस्थित राहायचं चकचकीत. मग ते मिंधे वगैरे आहेत ते गुळगुळीत दाढी करून सावरकरांच्या यात्रेत फिरणार आहेत का? हे लोकांसमोर प्रश्न आहेत. तुम्ही विचार यात्रा काढता. तुम्ही सावरकरांचं साहित्य वाचलं आहे का? आधी मिंधे गटाने सावरकर साहित्याचं पारायण करावं. भाजपनेही सावरकर विचाराचं पारायण करावं. मग सावरकर यात्रा काढावी, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Shivsena
Pune Politics: ‘त्या’ बॅनरबाजीवरील टीका जिव्हारी, पोस्टरवरून जगदीश मुळीक म्हणाले...

सावरकरांनी या देशाला दिशा दिलेली आहे. वैज्ञानिकदृष्टीकोन दिला आहे. हा वैज्ञानिक दृष्टीकोन भाजप आणि मिंधे गट पाळणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवादाचा संदर्भ दिला आहे.

भाजप म्हणते, गाय ही गोमाता आहे. तर सावरकरांना ते मान्य नाही. गाय ही उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर गायीचं गोमांस खायला हरकत नाही. हा सावरकरांचा विचार होता. हा विचार भाजपला मान्य आहे का? अनेक विचार आहेत हिंदुत्वाच्या बाबतीत. सावरकरांनी शेंडी जानव्याचे हिंदूत्व स्वीकरलं नाही. आम्हीही शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाकारलं आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

Shivsena
Pune News: भर चौकात त्यांनी मारली मिठी, पुण्यातील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.