Shivsena: पक्ष संपवण्यासाठी NCPची सुपारी; ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा राजीनामा देत गंभीर आरोप!

पक्षवाढीसाठी झटणाऱ्यांचं खच्चीकरण, नेतृत्वाकडून मुस्कटदाबी होत असल्याचा जिल्हाप्रमुखांचा आरोप
Shivsena
ShivsenaEsakal
Updated on

राज्यासह जिल्हा, गाव पातळीवरील राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना संपवली जात असल्याचा आरोप वारंवार केला जातो. अशातच ठाकरे गट जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना पासलकर यांनी स्वपक्षातील वरिष्ठांनी शिवसेना संपवायची सुपारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्याचा आरोप केला आहे.

सध्या पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल. असेही पासलकर यांनी स्पष्ट केले आहे.

दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतत दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याची बाब पासलकर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांच्या कानावर घातली परंतू त्यांनी त्यास महत्व दिले नाही. याउलट पासलकर यांचा विरोध असताना खासदार संजय राऊत यांची दौंड तालुक्यात जाहीर सभा होत आहे.

Shivsena
New Zealand Earthquake: पुन्हा एकदा न्यूझीलंड भूकंपाने हादरले! भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी

शिवसेनेत आपल्याला डावलले जात असल्याच्या कारणाने पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दौंडमध्ये माझी सभा होणार नाही, असे राऊत यांनी पासलकर यांना सांगितले तर माजी आमदार रमेश थोरात यांना सभा होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. या सभेबाबत राऊत यांनी मला तोंडावर पाडले आहे अशा तक्रारी पासलकर यांनी केल्या आहेत.

Shivsena
Shivsena: धनुष्यबाण चिन्हासंदर्भात ठाकरेंना दिलासा नाहीच; आजची सुनावणी रद्द

सध्या शिवसेनेतील काही वरिष्ठांनी पक्ष संपवायची राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे, त्यानुसार पक्षवाढीचे काम करणा-यांचे खच्चीकरण केले जात आहे. या बाबत पक्षाच्या वरिष्ठांना वेळोवेळी कल्पना दिली, परंतू त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मुस्कटदाबीला कंटाळून आपण पदाचा राजीनामा देत आहे. असे पासलकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Shivsena
Maharashtra Weather : शेतकऱ्यांच्या चिंचेत वाढ! पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.