लोकार्पण सोहळ्यात आव्हाडांनी पंतप्रधानांना केली विनंती, म्हणाले...

ठाणे ते दिवा मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात जितेंद्र आव्हाड म्हणाले,
Jitendra Awhad
Jitendra Awhadesakal
Updated on

मुंबई: ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या कार्यक्रमाला आॅनलाईन उपस्थित आहेत. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वेच्या जागेवर राहणारे नागरीक कोठे राहणार? तुम्ही या लोकांना राहायला घर द्याल पण यांना रोजी रो़टी कोण देणार, हे लोक खाणार काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. या कार्यक्रमात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve), केंद्रीय मंत्री कपील पाटील,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), खासदार राजन केळकर, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित आहेत.

जलद धिम्या लोकल गाड्या आणि एक्सप्रेस गाड्यांना प्रत्येकी दोन मार्गिका उपलब्ध होणार असून,यामुळे विनाअडथळा लोकल वाहतूक सुरु राहणार आहे. या मार्गावर ३६ लोकलच्या फेऱ्या सुरु होणार आहेत. यात ३४ एसी तर २ लोकल गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद पाहता रेल्वे बोर्ड एसी लोकलचे भाडे कमी करण्याचा विचार करत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी घोषणा करण्याची शक्यता आहे.

Jitendra Awhad
स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबईचे मोठे योगदान; मोदींनी केले कौतुक

ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी तुम्हाला विनंती करतो की, रेल्वेच्या जागेवर राहणाऱ्या नागरीकांचे तुम्ही घर उध्वस्त करू नका. रेल्वेच्या जागेवर राहणारे नागरीक कोठे राहणार? तुम्ही या लोकांना राहायला घर द्याल पण यांना रोजी रो़टी कोण देणार, हे लोक खाणार काय असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ठाणे आणि दिवा (Mumbai Local) यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे ६२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून, यात १.४ किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, ३ मोठे पूल, २१ छोटे पूल यांचा समावेश आहे. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीतील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीचा अडथळा दूर होणार असून, या मार्गांमुळे शहरात ३६ नवीन उपनगरीय गाड्या सुरू करता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.