Mumbai Attack: NIAने पकडलेल्या सहाव्या संशयित दहशतवाद्याकडून धक्कादायक खुलासा, मुंबईत करणार होते घातपात

NIA:पडघा येथून ताब्यात घेतलेल्या आकिफने भुसुरुंग बनवून त्याचे परिक्षणही केले होते, असा दावा कोर्टासमोर करण्यात आला.
ISIS
ISISEsakal
Updated on

ISIS Maharashtra Module:महाराष्ट्रामध्ये दहशतवादी कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अनेक संशयित दहशतवाद्यांना एटीएस आणि एनआयएकडून ताब्यात घेण्यात आले. शनिवारी (दि. ५ऑगस्ट) आयसिसच्या महाराष्ट्र मोड्यूलशी संबंधित सहावी अटक करण्यात आली होती.

एनआयएच्या पथकाने आकिफ नाचनला भिवंडीमधील पडघ्यातून अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली.

आकिफ नाचनला एनआयएने अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात युक्तीवाद करताना एनआयएच्या वकीलांनी दावा केला की या सर्व दहशतवाद्याचा मुंबईमध्ये दहशतवादी कारवाई करण्याचा हेतू होता.(Latest Marathi News)

मात्र, त्याआधीचं या सर्वांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे आणि अजूनही लोक यात सामील असू शकतात, अशी शक्यता एनआयएने वर्तवली आहे. नाचन आणि इतरांना परदेशी दहशतवादी संघटनांनी प्रशिक्षण दिल्याचा दावा एनआयएने कोर्टात केला होता.

ISIS
Titwala Murder Case: पत्नीने पतीचा मृत्यू दारु पिल्याने झाल्याचा दिला जबाब. मात्र, पोस्टमार्टममधून भलतंच सत्य उघड

या संशयित दहशतवाद्यांची चौकशी केली असता, हे लोक एकमेकांशी संपर्क करण्यासाठी VPN (Virtual Proxy Network)चा वापर करायचे, अशी माहिती समोर आली. आकिफने या प्रकरणातील इतर आरोपींच्या राहण्याची सोय केली, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. आकिफने IED (Improvised Explosive Device) बनवून त्याच्या परिक्षणात सहभागी होता, असेही एनआयएने केलेल्या आरोपात सांगण्यात आले.(Latest Marathi News)

एनआयने कोर्टासमोर दावा केला की आकिफ इतर आरोपींसोबत मिळून मुंबईत घातपात करण्याची तयारी करत होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक्स साहित्य आणि बनावट कागदपत्रे तपाय यंत्रणांकडून जप्त करण्यात आली आहेत.

याआधी महाराष्ट्राच्या विविध भागातून संशयित दहशतवाद्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. यातील दोघांना पुण्यातील कोथरुडमधून, एकाला रत्नागिरीमधून अटक करण्यात आली होती.

ISIS
Amit Shah in Pune: 'दादा, बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात'; अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.