लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटले की स्मरणिकेचे आकर्षण असते. उदगीर येथे होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मरणिकाही आकर्षण ठरणार आहे. ‘अश्मक’ नामक तीन भागांत असलेल्या या स्मरणिकेने उदगीरच्या इतिहासासह साहित्याचाही वेध घेतला आहे.
‘अश्मक’ हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते. अश्मक महाजनपद हे दक्षिण भारतातील एकमेव महाजनपद होते. मराठी भाषेचे अभ्यासक व संशोधकांच्या म्हणण्यानुसार मराठी भाषेचे मूळ स्थान हे ‘अश्मक’ होते. हा संदर्भ घेत संमेलनाच्या स्मरणिकेला ‘अश्मक’ हे नाव दिले आहे.
स्मरणिकेच्या पहिल्या भागात ‘उदगीरचा वारसा’ असून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा अनुषंगाने बारा लेख असतील. ‘साहित्याच्या सहवासात’ या दुसऱ्या भागात मराठवाड्यासह राज्यातील नामवंत लेखकांचे १६ लेख असतील. स्मरणिकेच्या ‘साहित्य वेध’ या तिसऱ्या भागात मान्यवर बारा साहित्यिकांचे लेख आहेत. भ. मा. परसवाळे यांनी स्मरणिकेसाठी मुखपृष्ठ तयार केले असून त्यांचीच रेखाचित्रेही आहेत.
अग्निशमन दलाची १३ वाहने सज्ज
उदगीर : साहित्य संमेलनासाठी प्रथमच राष्ट्रपती रामनाथ कोविंद येथे येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे . अग्निशमन दलही सज्ज झाले असून तेरा वाहनांसह ४० जवानांची नियुक्ती झाली आहे . राष्ट्रपती काहीकाळ थांबणार असलेल्या निवासी भागातील सर्व खिडक्या, दरवाजांचे पडदे, संमेलनाच्या व्यासपीठावरील सर्व पडदे अग्निरोधक (फायरप्रूफ) असणार आहेत.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या उदगीरमध्ये संमेलन होत असल्याने संमेलनाला साजेशी अशी ‘अश्मक’ नामक स्मरणिका काढत आहोत. तीन भागांत ही स्मरणिका असून सर्व वाचकांसाठी ती संग्राह्य अशीच असेल.
- प्रा. दीपक चिद्यरवार, संपादक, ‘अश्मक’ स्मरणिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.