केंद्रांवरील हालचालींवर पोलिसांच्या ड्रोन अन्‌ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष! सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 11000 पोलिसांचा बंदोबस्त, चहा-नाष्टा, जेवण जागेवरच

जिल्ह्यातील काही विशेषत: गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांवरील घडामोडींवर बुधवारी दिवसभर पोलिस यंत्रणेचे विशेष लक्ष असणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वेब कास्टिंगशिवाय मतदान केंद्रांबाहेरील प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे जवळपास ५१० सीसीटीव्ही व २२ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
Solapur News
Solapur Newssakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील काही विशेषत: गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांवरील घडामोडींवर बुधवारी (ता. २०) दिवसभर पोलिस यंत्रणेचे विशेष लक्ष असणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वेब कास्टिंगशिवाय मतदान केंद्रांबाहेरील प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे जवळपास ५१० सीसीटीव्ही व २२ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शहर-जिल्ह्यातील ३७३८ मतदान केंद्रांवर बुधवारी मतदानाच्या अनुषंगाने ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. त्यांच्या जोडीला १२ सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या देखील असतील.

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात तीन हजार ७३८ मतदान केंद्रे आहेत. त्यातील ११८३ केंद्रे शहरात तर दोन हजार ५५५ केंद्रे ग्रामीण भागात आहेत. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्यक्षेत्रात मतदानाचे २९१० बुथ असून शहरात ८२४ बुथ आहेत. पंढरपूर, बार्शी, माढा, माळशिरस, अक्कलकोट यासह अन्य मतदारसंघातील १४० बुथवर मतदानावेळी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यात उमेदवारांच्या गावांचाही समावेश आहे. त्याठिकाणी वेब कास्टिंगशिवाय पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन लावले आहेत. शहरातही पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच ड्रोन लावण्यात आले असून त्यात गरजेनुसार वाढ केली जाईल.

दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा अर्धा भाग (जुळे सोलापूर) शहरात येतो आणि शहर उत्तर व शहर मध्य हे दोन विधानसभा मतदारसंघ शहरातच आहेत. मतदान सुरु झाल्यापासून संपेपर्यंत येथील प्रत्येक हालचाली त्या ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये टिपल्या जातील. याशिवाय ज्या ठिकाणी गोंधळ होवू शकते, अशा केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त नेमला आहे. कोणताही अनुचित प्रकार होवू नये म्हणून पोलिसांनी स्वतंत्र उपाययोजना केल्या आहेत. काही ठिकाणी तक्रार झाल्यास त्यामागील कारण व त्यातील सहभागींचा शोध घेण्यास या सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त

  • (ग्रामीण भाग)

  • एकूण बुथ : २,९१०

  • बंदोबस्तातील अधिकारी-अंमलदार : ४,५००

  • होमगार्ड : २,५००

  • केंद्रीय सशस्त्र पोलिस बल : ९ तुकड्या

  • मतदान केंद्रांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे : ३३०

  • ड्रोन कॅमेरे : ५ ते ७

-------------------------------------------------------------------------------

  • (शहरी भाग)

  • एकूण बुथ : २,९१०

  • बंदोबस्तातील अधिकारी-अंमलदार : २,५००

  • होमगार्ड : ६००

  • केंद्रीय सशस्त्र पोलिस बल : ४ तुकड्या

  • मतदान केंद्रांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे : १८०

  • ड्रोन कॅमेरे : १० ते १५

पोलिसांना चहा-नाष्टा, जेवण जागेवरच

बुधवारी (ता. २०) जिल्हाभरात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात होणार आहे. बंदोबस्तासाठी मतदान केंद्रांवर व अन्य ठिकाणी नेमलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना चहा, नाष्टा व जेवण जागेवरच पोच केले जाणार आहे. जेवणात चपाती, भाजी, थोडा भात, याचा समावेश असेल. मतदानानंतर ‘ईव्हीएम’ तालुक्याच्या गोदामात पोच होईपर्यंत हा बंदोबस्त असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.