Maintenance Case : एक महिला, दोन वकील अन् निष्पापांची शिकार; पोटगीच्या नावावर पुरुषांना फसवणाऱ्या महिलेला हायकोर्टाचा दणका

Maintenance Case Mumbai High Court: जाधव यांनी सुनावणीला उशीर झाल्याचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालय आणि दंडाधिकारी न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली होती.
Maintenance Case Mumbai High Court Aurangabad Bench
Maintenance Case Mumbai High Court Aurangabad BenchEsakal
Updated on

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक महत्त्वाच्या निर्णय देत घटस्फोट आणि पोटगीच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक करणाऱ्या महिलेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

आरोपी महिलेने सुरुवातीला पोटगी मिळवी यासाठी गुन्हा दाखल केला होता. मात्र, तडजोड केल्यानंतर तिने गुन्हा मागे असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. लताबाई जाधव व त्यांच्या दोन वकिलांवर सिलोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जाधव यांनी सुनावणीला उशीर झाल्याचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालय आणि दंडाधिकारी न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली होती.

ही सुनावणी करताना न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांच्या खंडपीठाने सांगितले की, सुनावणीला थोडा विलंब झाला आहे आणि त्यामुळे ट्रायल कोर्ट आता लवकरात लवकर सुनावणी घेईल अशी अपेक्षा आहे.

दोन्ही न्यायालयांमध्ये आतापर्यंत झालेल्या सुनावणीनुसार ही बाब खरी असल्याचे दिसते कारण. याचिका दाखल करणाऱ्या महिलेचा भूतकाळही चांगला नसल्याचे पुराव्यांच्या आधारे दिसत आहे. अशा स्थितीत जामीन मिळाल्यानंतर ती फरार होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

न्यायमूर्ती मेहर म्हणाले की, असे दिसते की, या खटल्याला निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी ट्रायल कोर्ट सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु अनेकदा ते प्राधिकृत अधिकाऱ्याच्या नियंत्रणात नसते. त्यामुळे खटला लवकरात लवकर निकाली काढता यावा यासाठी संबंधित सर्व पक्षकारांनी न्यायालयाला सहकार्य केले पाहिजे.

जाधव यांना मी कधीच भेटलो नसल्याचा दावा एका व्यक्तीने केला असून जाधव यांनी त्यांच्या दोन वकिलांसह अन्य तीन जणांवरही असाच गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले आहे. दोन प्रकरणांमध्ये न्यायालयाबाहेर समझोता झाला आणि त्यानंतर खटला मागे घेण्यात आल्याचे त्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.

Maintenance Case Mumbai High Court Aurangabad Bench
Viral Video: पुण्यात रात्री थरार... कारमधून निघालेल्या इंजीनिअरच्या कुटुंबावर 40 जणांकडून रॉड, दगड अन् काठ्यांनी हल्ला; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान ही सर्व प्रकरणे एकसारखीच होती. या खटल्यातील व्यक्तीच्या याचिकेनंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आलेल्या अहवालात ही महिला वकिलांना बरोबर घेत लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायची आणि नंतर कोर्टाबाहेर सेटलमेंट करून केस मागे घ्यायची.

Maintenance Case Mumbai High Court Aurangabad Bench
Laxman Hake: ''सुधीर मते माझ्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष, मला त्याचा अभिमान'' बीडच्या नेत्याचं विधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.