कांद्याला प्रतिक्विंटल २९०० रुपयांचा सरासरी भाव! सोलापूर बाजार समितीत ४६२ गाड्या आवक; १०० रुपयाने उतरला दर; सर्वाधिक भाव ७००० रुपये

सोलापूर बाजार समितीत गुरुवारी ४६२ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. एकूण कांद्यापैकी सहा क्विंटलला सात हजार रुपयांचा दर मिळाला तर सरासरी भाव दोन हजार ९०० रुपयांपर्यंत होता. दोन दिवसांपूर्वी सरासरी भाव ३१०० रुपये होता, बुधवारी तो ३ हजारांपर्यंत होता.
onion
onionesakal
Updated on

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) ४६२ गाड्या कांदा विक्रीसाठी आला होता. एकूण कांद्यापैकी सहा क्विंटलला सात हजार रुपयांचा दर मिळाला तर सरासरी भाव दोन हजार ९०० रुपयांपर्यंत होता. दोन दिवसांपूर्वी सरासरी भाव ३१०० रुपये होता, बुधवारी तो ३ हजारांपर्यंत होता. पण, गुरुवारी सरासरी भावात १०० रुपयांची घट झाली होती.

सोलापूरसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे. सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावली होती आणि तो मागील काही दिवसांपर्यंत सुरुच होता. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीला शेतकऱ्यांनी लागवड केलेला बहुतेक कांदा सततच्या पावसामुळे खराब झाला. अनेकांनी खराब कांदा शेतातच सोडून दिला तर काहींनी त्यातील चांगला कांदा विकायला आणला. मात्र, त्याला ५०० ते ९०० रुपये क्विंटल असाच दर मिळाला. खर्चही निघत नाही म्हणून अनेकांनी तो कांदा शेतातच सोडून दिल्याचे पाहायला मिळाले.

आता पावसाळा संपल्याने कांद्याचा बाजार सुरळीत सुरू असून, वाहतुकीसाठी पण अडचण नाही. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत दररोज सरासरी ३५० ते ४४० गाड्या कांद्याची आवक आहे. सोलापूरसह पुणे, नगर, नाशिक, धाराशिव, बीड, लातूर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून व कर्नाटकातून कांदा सोलापूर बाजार समितीत विकायला येत आहे. यंदा कांदा कमी असल्याने आगामी काळात आणखी दर वाढतील, असा अंदाज शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आता पुन्हा कांद्याची लागवड करत असल्याचे चित्र आहे.

बाजार समितीतील गुरुवारची आवक

  • एकूण आवक

  • ४६२ गाड्या

  • एकूण क्विंटल

  • ४६,२७४

  • एकूण उलाढाल

  • १३.४२ कोटी

  • सरासरी भाव

  • २९०० रुपये

सर्वाधिक सात हजारांचा भाव नावालाच

गुरुवारी (ता. ७) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उच्चांकी सात हजार रुपये क्विंटल भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. पण, ४६ हजार २७४ क्विंटलमधील अवघ्या सहा क्विंटललाच तेवढा दर मिळाला आहे. तर ४६ हजार २४३ क्विंटल कांदा सरासरी दोन हजार ९०० रुपये क्विंटल दराने विकला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.