Ambadas Danve : राज्य सरकारकडून आरक्षणाचे गाजर;अंबादास दानवे,मागण्या मान्य होत नसल्याने असंतोष

राज्यातील मराठा समाजासह इतरांना राज्य सरकार आरक्षणाचे केवळ गाजर दाखवत आहे. एकही मागणी मान्य होत नसल्यामुळे महाराष्ट्रात असंतोष पसरला आहे,’’ असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
Ambadas Danve
Ambadas Danvesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘राज्यातील मराठा समाजासह इतरांना राज्य सरकार आरक्षणाचे केवळ गाजर दाखवत आहे. एकही मागणी मान्य होत नसल्यामुळे महाराष्ट्रात असंतोष पसरला आहे,’’ असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

‘मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच आपली भूमिका जाहीर केली. विधानसभेत आरक्षणाचा निर्णय घेऊन तो सरकारने केंद्राकडे पाठवावा. आपला खोटा मुखवटा झाकून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने विधानसभेत गोंधळ घडवून आणला,’’ असा आरोप दानवे यांनी केला. विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात केलेल्या कामगिरीचा अहवाल यावेळी दानवे यांनी माध्यमांसमोर मांडला.

मराठा समाजाच्या

आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांना राज्य सरकार वेळोवेळी आश्‍वासने देत आहे. पण अद्याप ‘सगेसोयऱ्यां’चा अध्यादेश काढलेला नाही. ओबीसी समाजाला आमच्या आरक्षणाचे काय होईल, याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारने आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. या विषयावर सरकारची भूमिका बोटचेपी असल्यानेच विरोधीपक्षाचे नेते बैठकीला गेले नाहीत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात राजकीय दबाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. अशा अधिकाऱ्यांची मस्ती जिरवली पाहिजे, असे ते म्हणाले. विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचे सरकार केवळ नाटक करत असल्याची टीका दानवे यांनी केली.

वेरूळ लेणीवर घातपाताची शक्यता असल्याचा अंदाज ‘एनआयए’ व्यक्त केला आहे, पण पुरातत्त्व विभाग गंभीर नाही. या परिसरात साधी पोलिस चौकी देखील नाही. राज्य सरकारने याप्रकरणी गांभीर्याने विचार करावा.

अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.