Gujarat Chief Minister Murder : पाकिस्तानने केली होती गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची हत्या

१३ एप्रिल १९१९ ही तारीख कोणताही भारतीय विसरणार नाही
Gujarat Chief Minister Murder
Gujarat Chief Minister Murder esakal
Updated on

Gujarat Chief Minister Murder : १३ एप्रिल १९१९ ही तारीख कोणताही भारतीय विसरणार नाही. त्या दिवशी अमृतसरमधील जालियनवाला बागेत झालेलं हत्याकांड भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणावा लागेल. तो बैसाखीचा दिवस होता. बागेत सुमारे २० ते २४ हजार लोकांची गर्दी जमली होती. दुपारी ४.३० पासून इथं जलसा सुरू होणार होता. जलसा सुरू होण्याच्या आधी थोडावेळ कर्नल रेजिनाल्ड डायर बागेत आला. त्याच्यासोबत शीख, बलूच आणि राजपूत रेजिमेंटचे ९० सैनिकही होते.

Gujarat Chief Minister Murder
Health Care Tips: तुमच्या जेवणात वापरलेला कांदा योग्य आहे ना? जाणून घ्या कांद्याचे प्रकार अन् फायदे

शिपाई ली एनफिल्ड रायफल्ससोबत होते. पहिल्या महायुद्धात ली एनफिल्ड रायफलने खूप प्रसिद्धी मिळवली होती. बागेच्या एकमेव गेटवर हल्ला झाला आणि डायरने गोळीबार करण्याचा आदेश दिला. बागेत गर्दी एवढी होती की एकेक गोळीने दोन दोन तीन जणांचे जीव घेतले. काही लोकांनी आपले जीव वाचवण्यासाठी तिथल्या विहिरीत उड्या मारायला सुरुवात केली. नंतर या विहिरीतून १२० मृतदेह बाहेर काढण्यात आले. ब्रिटिश सरकारने एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले होते. या हत्याकांडाने त्यावेळचा प्रत्येक माणूस हादरला होता.

Gujarat Chief Minister Murder
Life in NDA : एनडीएमधल्या कॅडेट्सचं आयुष्य कसं असतं ? इथे कसा मिळतो प्रवेश ?

त्या काळात इंटरनेट नव्हते. पंधरा दिवस जुनी घटना ताज्या बातम्यांसारखी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. काही दिवसांनंतर, जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांडाची बातमी गुजरातमधील भावनगरमध्ये पोहोचली, तेव्हा २० वर्षीय एक महाविद्यालयीन तरुण पेटून उठला. पुढच्याच वर्षी म्हणजे 1920 मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली पदवी घेण्यास नकार दिला. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर या तरुणाने लाला लजपत राय यांच्या 'सर्व्हेंट ऑफ पीपल' या संघटनेचे सदस्यत्व घेतले. बलवंतराय मेहता असे या विद्यार्थ्याचे नाव होते.

Gujarat Chief Minister Murder
Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

बलवंतराय यांचा राजकीय प्रवास सुरू झाला ते वर्ष १९२१. त्यांनी भावनगर प्रजामंडळाची स्थापना केली. त्याकाळी भावनगर हे संस्थान होते. इंग्रजांचा येथे प्रत्यक्ष कब्जा नव्हता. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी बलवंतराय सरंजामशाहीविरुद्ध मोर्चे काढू लागले होते. 1928 मध्ये गांधीजी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोली, सुरत इथं सत्याग्रह सुरू झाला. या सत्याग्रहाचे महत्त्वाचे सदस्य म्हणून बलवंतराय पुढं आले. 1930 ते 32 च्या असहकार आंदोलनात ते तुरुंगात होते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. स्वातंत्र्यापूर्वी सुमारे सात वर्षे ते तुरुंगात होते.

Gujarat Chief Minister Murder
Bajri Halawa Recipe : बाजरीची भाकरीच नाही तर हलवाही आहे स्वादिष्ट अन् पौष्टिक!

स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सांगण्यावरून ते काँग्रेस कार्यकारिणीत सामील झाले. १९५२ मध्ये देशात पहिल्यांदा निवडणुका झाल्या. त्यावेळी बलवंतराय काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले. त्यांचे विरोधक कृष्णलाल हे अपक्ष उमेदवार होते. मेहता ८०,२५६ मते मिळवून खासदार झाले. १९५७ मध्ये दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या. मेहता यांनी गोहिलवाड (भावनगर) येथून निवडणूक लढवली. समोर प्रजा सोशालिस्ट पार्टीचे जशवंत भाई मेहता होते. बलवंतराय यांनी ८२,५८२ मते मिळवून सहज विजय मिळवला.

Gujarat Chief Minister Murder
Coffee Recipe : घरच्या घरी कशी तयार कराल कॅफे स्टाइल कॉफी ?

पंचायती राजचे जनक

गांधींनी काढलेल्या 'स्वराज'च्या ब्लू प्रिंटमध्ये प्रत्येक गावाला स्वतंत्र युनिट म्हणून काम करायचे होते. प्रत्येक गाव स्वतःचे सरकार चालवू शकेल इतके स्वयंपूर्ण असावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच प्रत्येक गाव आणि ग्रामपंचायत मजबूत असणे आवश्यक होते. १९५७ च्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पंडित नेहरूंनी या दिशेने पुढाकार घेतला. खरं तर, जानेवारी १९५७ मध्ये, समुदाय विकासाच्या कार्यक्रमांची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. बलवंतराय मेहता या समितीचे अध्यक्ष होते.

Gujarat Chief Minister Murder
Paneer Corn Salad : जेवणाच्या थाळीचा स्वाद वाढवेल अशी टेस्टी आणि हेल्दी सॅलड रेसिपी

नोव्हेंबर १९५७ मध्ये या समितीने आपल्या शिफारशी सादर केल्या. त्रिस्तरीय पंचायत राजची संपूर्ण ब्लू प्रिंट समोर ठेवण्यात आली. १ एप्रिल १९५८ रोजी संसदेने बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी मंजूर करून त्यांची अंमलबजावणी केली. २ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडित नेहरूंनी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातून औपचारिकपणे भारतात पंचायती राज सुरू केला.

Gujarat Chief Minister Murder
Somnath Temple : सोमनाथ मंदिरात आहे असा एक रत्न ज्याच्या स्पर्शाने दगड सुद्धा सोन्यात बदलतो

गुजरातचे मुख्यमंत्री

२४ ऑगस्ट १९६८ रोजी आलेल्या कामराज योजनेत काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना राजीनामे द्यावे लागले. यात उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रभानू गुप्ता हे नेहरूंच्या विरोधी गटात होते. कामराज योजनेंतर्गत नेहरूंनी ऑगस्ट १९६३ मध्ये चंद्रभानू गुप्ता यांचा राजीनामा घेतला. मोरारजी देसाई या राजीनाम्याच्या विरोधात होते. त्यांनी नेहरूंना समजवण्याचा प्रयत्न केला. पण नेहरू ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांनी त्याच योजनेंतर्गत जीवराज मेहता यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला.

Gujarat Chief Minister Murder
Resolution 2023 : उज्वल भविष्यासाठी 2023 मध्ये कराव्यात अशा 23 गोष्टी; प्रभू गौरांगा दास यांचा सल्ला

गुजरात हे मोरारजींचे गृहराज्य होते. मोरारजींच्या इच्छेविरुद्ध नेहरूंच्या शिफारशीमुळे जीवराज मेहता राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. मोरारजींच्या दबावामुळे जीवराज मेहता यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मोरारजींनी बलवंतराय मेहता यांचं नाव सुचवलं. सप्टेंबर १९६३ मध्ये बलवंतराय मेहता गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री झाले. मोरारजी भाई यांनी आपल्या मर्जीतील माणसाला गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचवले.

Gujarat Chief Minister Murder
Ratan Tata Birthday : फक्त वडिलांच्या इच्छेखातर आर्किटेक्ट रतन टाटा बनले इंजिनियर, जाणून घ्या यशोगाथा

१९ सप्टेंबर १९६५ च्या दिवशी भारत-पाकिस्तान युद्ध शिगेला पोहोचले होते. युद्धामुळे गुजरातमध्येही जातीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. बलवंतराय मेहता यांनी द्वारकेजवळील मिठापूरच्या सभेला जायचं ठरवलं. द्वारका ते कराची हे अंतर ३५० किमी आहे. हा युद्धाचा काळ होता आणि विमानात बसून सीमेच्या इतक्या जवळ जाणे धोकादायक ठरणार होतं.

Gujarat Chief Minister Murder
Clove Tea Benefits : महागड्या कॉस्मेटिक्सने नाही तर फक्त एक कप चहा पिऊन त्वचेला बनवा तजेलदार

दुपारचे जेवण करून बलवंतराय मेहता अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. तेथे एक ब्रीचक्राफ्ट विमान त्यांची वाट पाहत होते. जहांगीर जंगू या विमानाचा पायलट होता. अहमदाबाद ते द्वारका अंतर ४४१ किलोमीटर होते. विमानाने टेकऑफ केले आणि द्वारकेच्या दिशेने निघाले. तिकडे कराचीजवळील मारीपूर एअरबेसवर साडेतीन वाजताच्या सुमारास एक पायलट त्याच्या उड्डाणाची तयारी करत होता. त्याने अवघ्या चार महिन्यांपूर्वी अमेरिकेतून F-86 Saber विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याला भुजजवळ उड्डाण करणाऱ्या विमानाची माहिती आणण्यास सांगितली. फ्लाइंग ऑफिसर कैस मजहर हुसैन असं या पायलटचे नाव होतं.

Gujarat Chief Minister Murder
Anarkali Suit Fashion : लग्नापासून ते कॅज्यूअल वेअरपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट असा एकमेव सूट

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कैस सांगतात -

"स्क्रॅम्बल सायरन वाजल्यानंतर तीन मिनिटांनी मी माझं फायटर प्लेन सुरू केले. माझ्या बदीन रडार स्टेशनने मला वीस हजार फूट उंचीवर उड्डाण करण्याचा सल्ला दिला. त्याच उंचीवर असताना मी भारतीय सीमा ओलांडली. तीन चार मिनिटांनी त्यांनी मला खाली यायला सांगितले. तीन हजार फूट उंचीवर भूजकडे जाणारे हे भारतीय विमान मला दिसले. मी ते विमान मिठाली गावाजवळ जाऊन गाठलं. ते नागरी जहाज असल्याचे पाहताच मी माझ्या कंट्रोलरला कळवलं की ते नागरी विमान आहे.

Gujarat Chief Minister Murder
Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशन कधी घ्यायचं आणि संस्थगित करायचं हे कसं ठरतं ?

"मी त्या विमानाच्या इतक्या जवळ गेलो की मला तिची नंबर प्लेटही वाचता आली. त्यावर व्हिक्टर टँगो लिहिलेले असल्याचे मी कंट्रोलरला सांगितले. हे आठ आसनी विमान होतं. त्यांनी मला तिथेच थांबायला सांगितले. वाट पाहत तीन चार मिनिटे गेली. मी खूप खाली उड्डाण करत होतो, त्यामुळे परतीच्या वाटेवर माझे इंधन संपेल अशी भीती वाटत होती, पण नंतर मला विमान खाली पाडण्याचे आदेश मिळाले.

Gujarat Chief Minister Murder
Maharashtra Karnataka Border : या पहिलवानाने स्वीकारलेलं बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिलं हौताम्य

कॅस बुचकळ्यात पडले. ते नागरी विमान असल्याचे त्यांना माहीत होते. हे विमान सीमेवरील पाकिस्तानी हद्दीत हेरगिरी करत असल्याची खात्रीलायक माहितीही त्यांच्याकडे नव्हती. कॅस सांगतात, मी जेव्हा ते विमान इंटरसेप्ट केलं तेव्हा त्या विमानाने स्वतःचे पंख हलवले. याचा अर्थ असतो , 'हॅव मर्सी ऑन मी', पण अडचण अशी होती की ते सीमेच्या एवढ्या जवळ उडत असल्याने आम्हाला संशय आला.

Gujarat Chief Minister Murder
Heart And Covid-19 : कोरोना व्हॅक्सिन अन् हार्ट अटॅकचा काय संबंध? वाचा काय सांगतात रिपोर्ट्स

पण कॅस फायटर पायलट होते. त्यांनी कोणतीही चौकशी न करता दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे कडक प्रशिक्षण त्यांना देण्यात आले होते. त्यांनी बलवंतराय यांच्या विमानापासून १०० मीटर उंचीवर निशाणा साधला. विमानाने पेट घेतला.

Gujarat Chief Minister Murder
Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

या विमानात बलवंतराय मेहता, त्यांच्या पत्नी सरोजबेन मेहता, त्यांचे तीन सहकारी आणि 'गुजरात समाचार'चे वार्ताहर होते. यापैकी कोणीही वाचले नाही. या अपघाताच्या तब्बल ४६ वर्षांनंतर पाकिस्तानी पायलट कैस हुसैन यांनी भारतीय विमानाचे पायलट जहांगीर इंजीनियर यांची मुलगी फरीदा सिंग यांना ईमेल करून झालेल्या घटनेबाबत खेद व्यक्त केला. वरवर पाहता तोपर्यंत त्यांच्याकडे खेद व्यक्त करण्याशिवाय काहीच उरले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.