पहिलीच्या वर्गात मुलाला मिळेल मोफत प्रवेश! ‘या’ ठिकाणी करा अर्ज, शासन भरेल इयत्ता आठवीपर्यंतची फी; सोलापूर जिल्ह्यातील 296 शाळांमध्ये 2496 विद्यार्थ्यांना संधी

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकता यावे म्हणून त्यांना ‘आरटीई’तून मोफत प्रवेश मिळतो. ‘आरटीई’तून इयत्ता पहिलीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आठवीपर्यंतचे शुल्क शासनातर्फे भरले जाते.
solapur
zp schoolssakal
Updated on

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील नामांकित स्वयंअर्थसहाय्यिता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘आरटीई’अंतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. त्या विद्यार्थ्यांची इयत्ता आठवीपर्यंतचे शैक्षणिक शुल्क शासनाच्या माध्यमातून संबंधित शाळांना दिले जाते. ‘आरटीई’तून प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मेपर्यंत आहे. सोलापूर जिल्ह्यातील २९६ शाळांमधील प्रवेशासाठी आतापर्यंत दोन हजार ८३० विद्यार्थ्यांनी ‘आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला ‘आरटीई’तून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कापोटी दरवर्षी अंदाजे आठशे कोटी रुपये द्यावे लागतात. राज्यातील एक लाख पाच हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘आरटीई’तून इयत्ता पहिलीच्या वर्गात नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. मात्र, शालेय शिक्षण विभागाने ‘आरटीई’च्या निकषांमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घरापासून एक कि.मी. अंतरावरील खासगी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची निवड करण्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला होता.

‘आरटीई’ प्रवेशास पात्र विद्यार्थ्याच्या घरापासून एक कि.मी. अंतरावर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेशिवाय दुसरी कोणतीही शाळा उपलब्ध नसल्यास त्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्याचा नियम बनवला होता. मात्र, याला विरोध करीत काहींनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने या बदलाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणेच ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली आहे. प्रवेशासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंकवर अर्ज करता येणार आहे.

‘आरटीई’तील शाळा

  • २९६

  • प्रवेश क्षमता

  • २,४९६

  • आतापर्यंत अर्ज

  • २,८३०

  • अर्जाची मुदत

  • ३१ मेपर्यंत

तालुकानिहाय ‘आरटीई’तील शाळा अन् प्रवेश

  • तालुका शाळा प्रवेश क्षमता

  • अक्कलकोट १४ ९५

  • बार्शी २६ ३०८

  • करमाळा २७ १५०

  • माढा ३३ २५९

  • माळशिरस ४५ २६६

  • मंगळवेढा १२ १०७

  • मोहोळ १७ १३७

  • पंढरपूर ४९ ३९०

  • सांगोला २६ २३८

  • उत्तर सोलापूर १९ १३७

  • दक्षिण सोलापूर १२ ११८

  • सोलापूर शहर १६ २९१

  • एकूण २९६ २,४९६

‘आरटीई’तून आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत

खासगी स्वयंअर्थसहाय्यता एलकेजी, युकेजी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या भरमसाट वाढत आहे. पालकांचाही कल त्या शाळांकडे वाढल्याची स्थिती आहे. या शाळांचे शैक्षणिक शुल्क आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना भरणे अशक्यप्राय होते. अशा घटकातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकता यावे म्हणून त्यांना ‘आरटीई’तून मोफत प्रवेश मिळतो. ‘आरटीई’तून इयत्ता पहिलीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आठवीपर्यंतचे शुल्क शासनातर्फे भरले जाते. जूनअखेर ‘आरटीई’ची प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com