Winter Season: हिवाळी अधिवेशनावर 100 कोटी खर्च; अजित पवारांनी दिली माहिती

Winter Season
Winter Seasonesakal
Updated on

दोन दिवसांपूर्वी, नागपूर हिवाळी अधिवेशनात आलेल्या आमदारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार उजेडात आला. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनावर एकूण किती खर्च केला जातो याचा खुलासा केला. (The cost of the winter session reached the of one 100 crore )

कपबशांच्या व्हिडीओनंतर अमोल मिटकरी यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये विधान भवन इमारत परिसरात असलेल्या शीतल ज्यूस सेंटरचे कर्मचारी शौचालयाच्या प्रवेशद्वारासमोरच संत्र्याची साल काढताना, इतर फळे धुताना आणि कापताना आढळले. त्यामुळे अधिवेशनात सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

यासर्वांवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जवळपास १०० कोटी रुपये आपण या हिवाळी अधिवेशनावर खर्च करतो. यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागणे, त्यांच्या भल्याची कामे होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच आम्ही काम करतो. पण कोट्यवधी रुपये खर्च करूनसुद्धा येथे येणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसेल, तर ही गंभीर बाब आहे.

Winter Season
Viral News: पोरीच्या नादात बनला खोटा आर्मी ऑफिसर; सापडल्यावर पळता भुई थोडी झाली!

नुकताच एक गंभीर प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित यंत्रणा गंभीर झालेली दिसत नाही. अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.