सोलापूर जिल्ह्यात विधानसभेची स्थिती काय? जागा वाटपाचा तिढा, इच्छुक म्हणतात स्वतंत्र लढा; सोलापुरातील 11 पैकी कोणता मतदारसंघ सध्या कोणाकडे आहे? वाचा...

माढा, मोहोळ, पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघात अनपेक्षित घडामोडी घडतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील सध्याचा मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसने सर्वच विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज घेतले आहेत. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीत देखील अशीच स्थिती आहे.
solapur district
solapur districtsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ असून, त्यातील ‘शहर मध्य’ वगळता सर्वच मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी पक्षांचे आमदार आहेत. त्यातील बार्शी, पंढरपूर-मंगळवेढा, माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर येथे भाजपचे आमदार असून, सांगोल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, करमाळ्यात अपक्ष, शहर मध्यमध्ये काँग्रेस आणि माढा व मोहोळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. पण, आता महायुतीचे जागा वाटप करताना भाजपला विद्यमान आमदाराचा एक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कोणते मतदारसंघ द्यायचे हा पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीतील इच्छुकांनी स्वबळावर लढूया, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. जेणेकरून जागावाटपाचा तिढा राहणार नाही हा त्यामागील हेतू आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात दोन खासदार, सहा आमदार भाजपचे होते. तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात एकमेव विरोधी आमदार राहिला होता. पण, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आणि माढा व सोलापूर या दोन्ही ठिकाणी त्यांचाच खासदार निवडून आला. त्यानंतर आघाडीतून फुटून महायुतीसोबत सत्तेत बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना उमेदवारी मिळाली तरी निवडून येईल की नाही, याची चिंता सतावू लागली. मराठा आरक्षणाचा फॅक्टर देखील त्याला कारण आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघात अनपेक्षित घडामोडी घडतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील सध्याचा मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसने सर्वच विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज घेतले आहेत. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीत देखील अशीच स्थिती आहे. काँग्रेसने सात जागांवर दावा केला असून, जिल्ह्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला किमान चार-चार जागा सोडाव्या लागतील. आता त्या जागा कोणत्या, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप अन् काँग्रेस मोठा भाऊ, पण पंचाईत जागावाटपाची

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघापैकी भाजप हा मोठा भाऊ असून, त्यांच्याकडे सध्या सहा आमदार आहेत. उर्वरित पाच जागांपैकी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन गप्प बसणार का, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला एक किंवा दोन जागा दिल्यास त्यांना हा तोडगा मान्य होईल का, याचा अंदाज इच्छुक बांधत आहेत. दुसरीकडे लोकसभेला महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरलेल्या काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यात एक आमदार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सध्या जिल्ह्यात एकही आमदार नाही. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचीही अशीच आवस्था आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध लढलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जागावाटपाचा पेच सुटणार का, याचीही सर्वांना उत्सुकता आहे. जागावाटपाचा तिढा न सुटल्यास आगामी निवडणुकीत बंडखोरी होण्याची किंवा तगडा उमेदवार न मिळणाऱ्या पक्षाला आयते उमेदवार मिळतील, अशी सद्य:स्थिती आहे.

‘शहर मध्य’ मतदारसंघ कोणाचा?

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या सध्या खासदार झाल्या असून, त्यांच्या शहर मध्य या मतदारसंघातून मोची, मुस्लिम समाजाने उमेदवारी मागितली आहे. दुसरीकडे खुद्द शहराध्यक्ष चेतन नरोटे इच्छुक आहेत. पण, या मतदारसंघावर माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीत शहर मध्य मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडे राहणार की दोन्ही बाजूला भाजपचे आमदार असल्याने हाही मतदारसंघ भाजप स्वत:कडेच ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.