शिक्षण संचालक म्हणाले, पाचवी ते सातवीच्या शाळा 'या' दिवसापर्यंत बंदच !

शिक्षण संचालक म्हणाले, पाचवी ते सातवीच्या शाळा "या' दिवसापर्यंत बंदच !
03School_20fb_20_20Copy_2.jpg
03School_20fb_20_20Copy_2.jpgGallery
Updated on
Summary

कोरोनामुक्‍त गावांमध्ये सध्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. मात्र, बहुतेक शहरातील शाळा बंद आहेत.

सोलापूर : राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा (School) 17 ऑगस्टपासून सुरू होतील, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) काढला. मात्र, तो रद्द झाल्याबद्दल काहीच अधिकृतपणे शिक्षणाधिकाऱ्यांना (Education Officer) कळविण्यात आलेले नाही. तरीही, कोरोनाची (Covid-19) स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत शाळा सुरू करण्याची घाई केली जाणार नाही. मंत्रिमंडळाच्या (Cabinate) निर्णयानंतरच पाचवीपासून पुढे शाळा सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दत्तात्रय जगताप (Director of the school education department Dr. Dattatraya Jagtap) यांनी दिली.

03School_20fb_20_20Copy_2.jpg
डेंग्यू होऊ नये म्हणून 'हे' करा उपाय !

कोरोनामुक्‍त गावांमध्ये सध्या आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. मात्र, बहुतेक शहरातील शाळा बंद आहेत. आणखी काही गावे कोरोनामुक्‍त झाली असून त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी काढले. कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपली नसून पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये तिसऱ्या लाटेची भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर पाचवी ते बारावीपर्यंतच्या नव्या शाळा सुरू होणार नाहीत, असे मंत्र्यांनी तोंडी सांगितले. त्यावर लेखी आदेश न निघाल्याने शाळांचे मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला मंत्र्यांनी आव्हान दिल्याने आता कॅबिनेट बैठकीशिवाय पाचवी ते सातवीचे वर्ग बंदच राहतील, असे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, राज्यातील कोरोनामुक्‍त गावांमध्ये नव्याने रुग्ण आढळल्याने बहुतेक गावांमधील शाळा बंद कराव्या लागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडे ढकलण्यात आला आहे.

शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा आदेश काढला आहे. परंतु, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल. तोवर नव्याने कोणत्याही शाळा सुरू होणार नाहीत. कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय होईल.

- डॉ. दत्तात्रय जगताप, संचालक, शालेय शिक्षण, पुणे

03School_20fb_20_20Copy_2.jpg
श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर

अकरावीसाठी 125 व 225 रुपयांचे शुल्क

राज्यातील जवळपास 16 लाख विद्यार्थी अकरावीसाठी प्रवेश घेणार आहेत. यंदा निकालाची टक्‍केवारी वाढल्याने विज्ञान व वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे चित्र आहे. सीईटी रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता गुणांनुसार प्रवेश मिळणार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करण्याचे शुल्क निश्‍चित झाले आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 225 रुपयांचे शुल्क असणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेशाचा अर्ज करताना 125 रुपयांचे शुल्क भरावे लागेल, असेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले. प्रवेश अर्जानंतर विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल, त्या ठिकाणचे शैक्षणिक शुल्क त्यांना भरावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.