मोठी बातमी! राज्यात उच्च शिक्षणात गळतीचे प्रमाण 65 टक्के; ‘जीईआर’मधून माहिती उघड; सोलापूर जिल्ह्यातील केवळ 11 टक्केच विद्यार्थी शिकतात उच्चशिक्षणापर्यंत

इयत्ता बारावीनंतर बहुतेकजण पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण करतात. मात्र, अनेकजण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतानाच विविध अडचणींमुळे अर्ध्यातून शिक्षण सोडत असल्याची वस्तुस्थिती केंद्राच्या ‘जीईआर’मधून (ग्रॉस एनरोलमेंट रेशो) समोर आली आहे. महाराष्ट्र या बाबतीत देशात १५व्या क्रमांकावर आहे.
higher education exam
higher education examsakal
Updated on

सोलापूर : कौटुंबिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचा खर्च परवडत नाही, वसतिगृहांची पुरेशी सोय नाही. उच्चशिक्षणांनतर पुढे नोकरीची हमी तथा शाश्वती नाही. या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीनंतर बहुतेकजण पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण करतात. मात्र, अनेकजण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतानाच विविध अडचणींमुळे अर्ध्यातून शिक्षण सोडत असल्याची वस्तुस्थिती केंद्राच्या ‘जीईआर’मधून (ग्रॉस एनरोलमेंट रेशो) समोर आली आहे. महाराष्ट्र या बाबतीत देशात १५व्या क्रमांकावर आहे.

उच्चशिक्षणातील गळती रोखण्यासाठी आता २०३० पर्यंत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने आता मुलींना उच्चशिक्षण मोफत करीत ६४२ कोर्सेसची फी शासन भरणार आहे. अनेक विद्यापीठांनी कौशल्य विकासाचे विविध कोर्सेस सुरू केले आहेत. दुसरीकडे नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत ॲकॅडमिक बॅंक क्रेडिट (एबीसी) पद्धत सुरू केली असून त्यानुसार विद्यार्थी मधूनच शिक्षण सोडून गेला आणि काही वर्षांनी त्याला शिक्षण घ्यायचे असल्यास तो जेथून शिक्षण सोडून गेला, तेथूनच त्याला पुढे शिक्षण घेता येणार आहे. दरम्यान, उच्चशिक्षणातील मुलांची टक्केवारी वाढावी, यासाठी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणखी कोणते उपाययोजना करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जीईआर म्हणजे नेमकं काय?

ग्रॉस एनरोलमेंट रेशो (GER) हे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे मोजमाप करण्यासाठी एक सांख्यिकीय साधन आहे. १८ ते २३ वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विभाजित करून GER ची गणना केली जाते.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उद्दिष्ट गाठणे शक्य

केंद्रीय शिक्षण खात्याच्या ‘जीईआर’नुसार महाराष्ट्रात इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ ३४ टक्क्यांपर्यंत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्याचे प्रमाण अवघे ११ टक्के आहे. आता २०५० पर्यंत हे प्रमाण ५० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यवाही सुरू आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे निश्चितपणे हे उद्दिष्ट गाठता येईल.

- डॉ. श्रीकांत अंधारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

महाराष्ट्र देशात १५व्या क्रमांकावर

ग्रॉस एनरोलमेंट रेशोनुसार उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात १५ व्या क्रमांकावर आहे. चंदीगढ, पाँडेचरी, तमिळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, हरियाना, तेलंगण, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, आंध्रप्रदेश, कर्नाटक या १४ राज्यांचा ‘जीईआर’ महाराष्ट्र राज्यापेक्षा सुधारलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.