सर्वप्रथम कोरोनामुक्त गावांमध्ये पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.
सोलापूर : कोरोनाची (Covid-19) स्थिती पाहून सध्या आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. दुसरीकडे, पहिलीपासूनचे वर्ग ऑनलाइन (Online Education) सुरू आहेत. परंतु, ऑनलाइनचे दुष्परिणाम व पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची घसरलेली गुणवत्ता, बालविवाह (Chil Marriage), बालमजुरीत (Child Labour) वाढ या पार्श्वभूमीवर आता सर्वप्रथम कोरोनामुक्त गावांमध्ये पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठविला असून, मंगळवारी (ता. 21) मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल. आगामी सात-आठ दिवसांत मुख्यमंत्री निश्चितपणे त्यासंबंधीचा निर्णय घेतील, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली.
राज्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या जवळपास पावणेदोन लाख शाळा आहेत. त्या शाळांमध्ये दोन कोटी 13 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशित आहेत. सध्या आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, अन्य शाळा बंद असल्याने सर्व पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठविलेले नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात असल्याने पालकांनी सावध भूमिका घेतली आहे. तत्पूर्वी, कोरोनामुक्त गावांमध्ये पाचवीपासूनचे वर्ग ऑफलाइन सुरू करण्याचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले. मात्र, पुन्हा मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने शाळा सुरू करण्याची घाई नको म्हणून वक्तव्य केले आणि शिक्षण विभागाने ते परिपत्रक रद्द न करता बाजूला ठेवले. शाळा सुरू करण्याचा निर्णय आता राज्य मंत्रिमंडळ घेईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यासंबंधीचा निर्णय लवकरच होईल, असा विश्वास शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मार्च 2020 पासून शाळा बंद असल्याने चिमुकली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याची स्थिती आहे. बऱ्याच पालकांनी मुलांमधील दुष्परिणाम पाहून ऑनलाइन शिक्षणापासून त्यांना दूर ठेवले आहे. मुलांची गुणवत्ता घसरली आहे. या पार्श्वभूमीवर आता त्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी घेऊ शकतात निर्णय
ज्या गावात दीड-दोन महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे तंतोतंत पालन करून ऑफलाइन शाळा सुरू होणार आहेत. शिक्षकांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक केले जाणार असून, चिमुकल्यांच्या पालकांनीही लस टोचून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक परिस्थिती पाहून आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या नात्याने ऑफलाइन शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय जगताप यांनी दिली.
शाळा अन् विद्यार्थ्यांची स्थिती
पहिली ते चौथीच्या शाळा : 99,003
एकूण विद्यार्थी : 78,46,542
पाचवी ते सातवीच्या शाळा : 29,383
विद्यार्थी संख्या : अंदाजित 32 लाख
आठवी ते बारावीच्या शाळा : 46,365
एकूण विद्यार्थी : 1,03,07,457
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले...
अमरावती जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये सुरू आहेत ऑफलाइन शाळा
ऑफलाइन शाळा सुरू करण्याची नितांत गरज; पुढील आठवड्यात होईल अंतिम निर्णय
कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून ऑफलाइन शाळा सुरू करणे शक्य
ऑनलाइन शिक्षणापासून अनेकजण वंचित; पूर्वीच्या शासन निर्णयानुसार शाळा सुरू करता येईल
पुढील आठवड्यात शाळा सुरू करण्याबाबत बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील निर्णय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.