सोलापूर शहरात ‘या’ परिसरात आठवे पोलिस ठाणे! एमआयडीसी व विजापूर नाका पोलिस ठाण्यांची हद्द घटणार, मनुष्यबळ किती असणार? वाचा सविस्तर...

सोलापूर शहराचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली तरीदेखील ना पोलिस ठाण्यांची ना पोलिस मनुष्यबळात वाढ झाली. आता विमानसेवा देखील सुरू होत असल्याने सोलापूर पोलिस आयुक्तालयातर्फे विमानतळ परिसरात नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला आहे.
solapur city police
solapur city policesakal
Updated on

सोलापूर : अंदाजे १५ वर्षांपासून सोलापूर शहरात सात पोलिस ठाणी असून आजही पोलिस ठाण्यांसह मनुष्यबळाची संख्या तेवढीच आहे. सोलापूर शहराचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली तरीदेखील ना पोलिस ठाण्यांची ना पोलिस मनुष्यबळात वाढ झाली. आता विमानसेवा देखील सुरू होत असल्याने सोलापूर पोलिस आयुक्तालयातर्फे विमानतळ परिसरात नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला आहे.

विमानतळ परिसरात नव्याने पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव पाठविण्यापूर्वी पोलिस आयुक्तालयाने त्या परिसरातील धार्मिक स्थळे, संवेदनशील ठिकाणे, जाती-धर्मातील विविधता, गुन्ह्यांचे प्रमाण (गंभीर, किरकोळ, खून, अत्याचार) याचाही अभ्यास केला आहे. नवीन पोलिस ठाण्यासाठी गृह विभागाला नव्याने काहीही द्यायचे नाही, त्यासाठी आर्थिक भार देखील शासनावर पडणार नाही.

विजापूर नाका पोलिस ठाणे व एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणारा अडीच पोलिस चौक्यांचा भाग या नवीन पोलिस ठाण्यात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्याकडील काही कर्मचारी नवीन पोलिस ठाण्यासाठी घेतले जाणार आहेत. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या माध्यमातून तो प्रस्ताव आता गृह विभागाला पाठविण्यात येणार आहे.

नवीन पोलिस ठाण्याची गरज

सोलापूर शहराचा विस्तार वाढत असून भविष्यात आणखी वाढेल. काही दिवसांत होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा देखील सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलिस ठाणे करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एमआयडीसी व विजापूर नाका पोलिस ठाण्याचा काही भाग नवीन पोलिस ठाण्याअंतर्गत समाविष्ट केला जाईल.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

नवीन पोलिस ठाण्याची रचना अशी...

नव्याने सुरू होणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्याअंतर्गत एमआयडीसी व विजापूर नाका पोलिस ठाण्यातील काही भाग समाविष्ट केला जाणार आहे. पोलिस ठाण्यात ५० पोलिस कर्मचाऱ्यांसह एक पोलिस निरीक्षक, दोन सहायक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक असे मनुष्यबळ असणार आहे.

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यातून मिळेल तातडीने मंजुरी

सोलापूर पोलिस आयुक्तालयाने गृह विभागाला पाठविलेल्या नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावा, यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्यास निश्चितपणे काही दिवसांत त्याठिकाणी पोलिस ठाणे सुरू होऊ शकते. खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांचाही प्रयत्न त्यासाठी जरुरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.