Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्गाची प्रवेशव्दारच गेली पाण्यात, वाहनधारकांची गैरसोय

Satara: दुर्लक्षच झाल्याने त्या-त्या गावातील आबालवृध्दांना मोठा त्रास करावा लागत असल्याने त्यांच्यातुन संपात व्यक्त होत आहे
Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्गाची प्रवेशव्दारंच गेली पाण्यात, वाहनधारकांची गैरसोय
Pune-Bangalore Highwaysakal
Updated on

Karhad: पुणे-बंगळुरु महामार्गातंर्गत शेंद्रे ते कागल दरम्यान सध्या सहापदरीकरणाचे काम जागोजागी सुरु आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी एक-एक टप्पा घेवुन काम करण्यात येत आहे.

मात्र हे काम करताना महामार्ग उंच आणि सेवा रस्ते खाली अशी स्थिती झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आटके टप्पा, नांदलापुर, जखिणवाडी, पाटण तिकाटणे, गोटे, खोडशी आदि गावाच्या प्रवेशव्दारावरच पाणी साचत आहे.

त्यातुन वाहनधारकांना मार्ग काढत गावात जावे लागत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, महिला आणि विद्यार्थी यांच्या अपघाताचा धोकाच निर्माण झाला आहे. पाणी जाण्यासाठी निचरात न करण्यात आल्याने हे पाणी साचत आहे.

Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्गाची प्रवेशव्दारंच गेली पाण्यात, वाहनधारकांची गैरसोय
Satara News : रात्री- अपरात्री ड्रोन उडवतंय तरी कोण? ;फलटण शहरासह तालुका चिंतेत,पोलिस यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान

महामार्गाचे काम पुर्ण करण्याच्या नादात गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याकडे महामार्ग विभागाचे काम सुरु झाल्यापासुनच दुर्लक्षच झाल्याने त्या-त्या गावातील आबालवृध्दांना मोठा त्रास करावा लागत असल्याने त्यांच्यातुन संपात व्यक्त होत आहे.

पुणे-बेंगळुरु महामार्गाच्या सहापदरीकरणाचे कऱ्हाड तालुक्याच्या हद्दीतील काम गेल्या दीड वर्षापासुन सुरु आहे. त्या कामाच्या प्रारंभी पाणी निचऱ्याची सोय करणे गरजेचे होते. मागील पावसाळ्यात महामार्गाच्या कामामुळे अनेक गावच्या प्रवेशव्दारावर पाणी साचले.

त्याचबरोबर मोठ्या पावसाने अनेकांच्या घरातही पाणी घुसुन नुकसान झाले. मात्र त्यानंतर महामार्गाच्या कामात सुधारणा होवुन सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली.

मात्र महामार्गाचे काम उरकरण्याच्या नादात सांडपण्याची समस्या आजअखेर कायम राहिली आहे. महामार्गाचे काम झपाट्याने होत असल्याने वाहनधारकांची चांगली सोय होत आहे मात्र त्या परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी, शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे.

Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्गाची प्रवेशव्दारंच गेली पाण्यात, वाहनधारकांची गैरसोय
Satara News : रात्री- अपरात्री ड्रोन उडवतंय तरी कोण? ;फलटण शहरासह तालुका चिंतेत,पोलिस यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान

महामार्ग-सेवा रस्त्याच्यामध्येच गटरची उभारणी

महामार्गावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी संबंधित ठेकेदाराने सेवा रस्ता आणि महामार्ग यांच्यामध्ये गटर केले आहेत. त्यामुळे महामार्ग उंच आणि सेवा रस्ते खाली अशी स्थिती झाली आहे.

महामार्गावरील पाणी संबंधित गटरमधुन जाईल मात्र सेवा रस्ते उंचीने खाली असल्याने त्यावरील पाणी कुठुन जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे आजखेर बघितलेलेच नाही. त्यामुळे संबंधित गटरची उभारणी करताना त्या-त्या परिसरातील लोकांना विश्वासात घेतेले नाही आणि ही गटरची उभारणी चुकीची असल्याच्याही ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्गाची प्रवेशव्दारंच गेली पाण्यात, वाहनधारकांची गैरसोय
Zilla Parishad Satara : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये आता ‘अंकुर बालशिक्षण’ जिल्हा परिषदेचा उपक्रम; शिक्षणाचे होणार मूल्यांकन, अभ्यासक्रम तयार

प्रांत, तहसीलदारांनी ओढे खुले करण्याची गरज

महामार्गाच्या पश्चिमेकडून पुर्वेकडे उतार आहे. त्यानुसार त्या-त्या मार्गाच्या कडेला गावोगावच्या ओढ्यातुन येणारे पाणी नैसर्गीकरित्या यापुर्वी येवुन त्या ओढ्याव्दारे नदीला मिळत होते. मात्र गेल्या अनेक वर्षापासुन त्या ओढ्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे त्याचबरोबर महामार्गाच्या कामातही काही ठिकाणी ओढ्याची तोंडे बंद झाली आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी वाटच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता त्याकडे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनीच लक्ष देवुन ते नैसर्गिक ओढे खुले करण्याची गरज आहे.

महामार्गाच्या कामात पाण्याच्या निचऱ्याचीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे थोडाजरी मोठा पाऊस झाला तरी आटके गावच्या प्रवेशव्दारातच गुडघाभर पाणी साचत आहे. त्यातुन दुचाकीस्वार, महिला आणि विद्यार्थी येताना त्यांची गैरसोय होत आहे. त्या पाण्याचा अंदाज न आल्याने अपघातही झाले आहेत. त्याकडे महामार्ग विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्यायच राहणार नाही.

धनाजी पाटील

भाजप कऱ्हाड दक्षिण

तालुकाध्यक्ष, आटके

Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्गाची प्रवेशव्दारंच गेली पाण्यात, वाहनधारकांची गैरसोय
Satara News : पेरणीसाठी मिळवा अनुदानावर बियाणे ;अल्पभूधारकांना मिळणार निम्म्या किमतीत

महामार्गाच्या कामामुळे गावात येण्या-जाण्यासाठी असणारी गावांची प्रवेशव्दाराचे रस्ते पाण्याने भरत आहेत. त्यातुनच आबालवृध्दांना ये-जा करावी लागत आहे. त्याकडे लक्ष देणारे कोणी आहे की नाही ? नागरीक, वाहनधारक, महिला, विद्यार्थी यांना अजुन किती दिवस त्रास सहन करायला लावणार आहात ? जिल्हाधिकारी यांनीच यामध्ये लक्ष घालुन आम्ही माणसं आहोत याचा विचार करुन किमान गावात येण्यासाठी तरी चांगला रस्ता करुन द्यावा.

विश्वासराव शिर्के

जेष्ठ नागरीक

नांदलापूर

महामार्गाच्या कामावेळी भराव टाकुन रस्ता उंच केला आहे. त्यामुळे सेवा रस्ते खाली गेले आहेत आणि महामार्ग उंच झाला आहे. महामार्गाच्या पश्चिमेकडून पुर्वेला उत्तारा आहे. महामार्गाचे काम करण्याअगोदर पाण्याच्या निचाऱ्याच व्यवस्था करायली हवी होती. मात्र त्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्थाच केलेली नाही. त्यामुळे शेतातील पाणी घरात, दुकानात शिरत असुन अनेक गावांच्या प्रवेशव्दारावर पाणी साचत आहे. त्यातच नैसर्गीक ओढे मुजवण्यात आले आहेत. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी पश्चिमेकडील आणि पुर्वेकडील ओढ्यावरील अतिक्रमण काढून त्यांची तोंडे मोकळी करणे आवश्यक आहे. महामार्ग विभागाच्या ठेकेदाराने सेवा रस्त्याचे गटरमध्ये नेले पाहिजे आणि पाणी निचाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे.

अशोकराव थोरात

शेतीमीत्र, मलकापूर

Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्गाची प्रवेशव्दारंच गेली पाण्यात, वाहनधारकांची गैरसोय
Satara Rain : माणला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस;जूनमधील स्थिती,पंधरवड्यात ३३२ टक्के पर्जन्यमान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.