Annabhau Sathe Jayanti
Annabhau Sathe Jayantisakal

Annabhau Sathe Jayanti : मातंग समाजासाठी ‘आर्टी’ ठरेल दीपस्तंभ ;मुख्यमंत्री,तरुणांना उद्योग, नोकरी, शिक्षणात मार्गदर्शन

‘‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती वंदनीय आहेत. आज उभारली जाणारी ‘आर्टी’ ही ‘बार्टी’च्या धर्तीवरची संस्था मातंग समाजातील तरुणांना उद्योग नोकरी शिक्षण या क्षेत्रात मार्गदर्शन करेल.’
Published on

मुंबई : ‘‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती वंदनीय आहेत. आज उभारली जाणारी ‘आर्टी’ ही ‘बार्टी’च्या धर्तीवरची संस्था मातंग समाजातील तरुणांना उद्योग नोकरी शिक्षण या क्षेत्रात मार्गदर्शन करेल.’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) कार्यालयाचे उद्‍घाटन आज शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच संकेतस्थळ, पोर्टल व ‘सहज शिक्षा’ अॅपचे उद्‍घाटनही यावेळी करण्यात आले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास मंत्र्यांसह आमदार अमित गोरखे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, ‘आर्टी’ चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे उपस्थित होते.

‘‘अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने शिष्यवृत्ती किंवा कर्ज मिळणे ही आर्थिक जबाबदारी नसून ती सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे. हे भान युवकांनी ठेवले पाहिजे,’’ अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग आपण राज्यांमध्ये निर्माण केला असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभे करणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे,’’ असे शिंदे यांनी सांगितले. प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज व लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत कर्जाच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

‘अण्णा भाऊ’ वैश्विक

‘‘अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण ‘आर्टी’ची सुरुवात करीत आहोत हा सामाजिक चळवळीतील महत्त्वाचा टप्पा आहे. या संस्थेची स्थापना व उद्‍घाटन केले असल्याचे मला समाधान वाटते. अण्णा भाऊ साठे यांच्या रशियातील पुतळ्याच्या उद्‍घाटन कार्यक्रमासाठी मी तेथे गेलो. अण्णा भाऊ साठे यांनी मराठी भाषा, मराठी साहित्य हे साता समुद्रा पार पोहोचवले असून त्यांचे व्यक्तिमत्त्व वैश्विक आहे,’’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘‘मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक आहे,’’ असे ते म्हणाले.

‘बार्टी’ या संस्थेच्या धर्तीवर ‘आर्टी’ची स्थापना करण्याची मातंग समाजाची मागणी आज सरकारने पूर्ण केली आहे. ‘आर्टी’ कार्यालयाच्या उद्‍घटनामुळे आता संस्थेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

- शंभूराज देसाई, उत्पादनशुल्क मंत्री

स्मारकाला निधी

‘‘अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी समाजाच्या उद्धारासाठी उत्तुंग कार्य केले आहे. घाटकोपरमधील चिरागनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्यदिव्य स्मारक लवकरच उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.