पुणे - मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात अनेक भागांत दमदार पाऊस पडल्यानंतर आता जोर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कोकणात अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. तर घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक १९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे धरणांत अजूनही येवा सुरूच आहे.