मुंबई- कोरोना अटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ७ सदस्यीय टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्त्वात हा टास्कफोर्स काम करेल. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (The Maharashtra government has reconstituted newly formed 7 member task force COVID19 ICMR chief Dr Raman Gangakhedkar knp94)
जगभरासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 हा वेगाने पसरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सरकार अॅक्शन मोडमध्ये गेले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारकडून सात सदस्यीय टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी टास्कफोर्स काम करणार आहे.
सध्याच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत नव्या व्हेरियंटची लागण झालेले ८३ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. लोकांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना सदृष्य लक्षणं आढळून आल्यास तात्काळ उपचार घेण्यास आणि आवश्यक ती खबरदारी बाळण्यास सांगण्यात आलं आहे.
ऑक्टोंबर ते जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा रिकॉर्ड आहे. २०२० ते २०२२ च्या आकडेवारीतून हेच दिसून आलं आहे. त्यामुळेही सरकार खबरदारी घेत आहे. येत्या काळात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्यातील रुग्णालयांना सज्ज राहण्यास आणि आवश्यक ती तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्यात. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.