राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार

राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार
Updated on

मुंबई: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज मुंबईत होत्या. भारती पवार यांनी आज मुंबईमध्ये कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. आज दुपारी १२ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार बैठक पार पडली आहे. मुंबईबरोबर राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून बिघडत चाललेल्या परिस्थितीवर केंद्राचीही नजर आहे. या संदर्भातील बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, राज्यातील सध्याचं काम हे संथगतीने सुरु आहे. राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी आपल्या कामाची गती वाढवावी.

राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार की घटणार? लवकरच मोठा निर्णय

पुढे त्यांनी म्हटलंय की, प्रत्येक राज्यावर केंद्राचं लक्ष आहे. महाराष्ट्रात आठवड्याभरात कोरोनाची संख्या वाढली आहे. केंद्राने सर्व राज्यांना नियमावली दिली आहे. मुंबईत वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून वेळीच पावलं उचलली गेली पाहिजेत. कोरोना लशीचा पुरेसा पुरवठा देखील केंद्राने केला आहे.

राज्याचं कोरोनाबाबतचं काम संथगतीनं; गती वाढवावी: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार
भारतानं चीनला दिलं सडेतोड प्रत्युत्तर; गलवानमध्ये फडकावला तिरंगा

काळजी घेतली तर कोरोनाचा हा प्रसार रोखता येऊ शकतो. केरळसारख्या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील काम संथगतीने सुरु आहे. राज्यसरकारला विनंती आहे की त्यांनी कामाची गती वाढवावी. बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊन हेल्थ बजेट दिलं गेलंय. केंद्राने आपली जबाबदारी पार पाडलीय, मग राज्य सरकारच्या या तक्रारी योग्य नाहीत,असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.