माणूस साक्षर झाला पण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला : कोकरे

माणूस साक्षर झाला पण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला : रामदास कोकरे
माणूस साक्षर झाला पण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला : कोकरे
माणूस साक्षर झाला पण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला : कोकरेSakal
Updated on
Summary

माणूस साक्षर झाला पण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला, असे मत कल्याण-डोंबवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केले.

करमाळा (सोलापूर) : घनकचरा (Solid waste) ही एक जागतिक समस्या आहे. जसजसे नागरीकरण वाढले तसे कचऱ्याचे प्रमाण व त्यामधील अविघटनशील घटक यांचे प्रमाण वाढले. कचऱ्या धील प्लास्टिक, काच, रबर, डेब्रिज इ. अविघटनशील घटकामुळे डंपिंग ग्राउंड वरील विघटनशील घटकांचे देखील नैसर्गिकरीत्या विघटन होत नाही व त्यामुळे प्रत्येक शहरात कचऱ्याचे डोंगर निर्माण होतात व त्यामधून अहोरात्र विषारी वायूचे उत्सर्जन होत राहते. म्हणजेच जागतिक तापमानवाढीला (Global Warming) कारणीभूत ठरणाऱ्या घटकामध्ये घनकचऱ्यामधून उत्सर्जित होणाऱ्या हरित वायूचा हिस्सा साधारणपणे 4 टक्के आहे. यावरून असे दिसून येते, की माणूस साक्षर झाला पण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला, असे मत कल्याण-डोंबवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे (Ramdas Kokare) यांनी व्यक्त केले. त्यांनी याबाबत त्यांच्या फेसबुक (Facebook) पेजवर कचरा व्यवस्थापनावर सविस्तर मांडणी केली आहे.

1950 पूर्वीची घनकचरा व्यवस्थापन पद्धत

पूर्वी दैनंदिन कचऱ्यामध्ये विघटनशील घटकच असायचे. हा कचरा घराजवळ एका उकिरड्यामध्ये संकलित केला जात असे. वर्षभरात तो कचरा पूर्ण कुजून शेतात खत म्हणून टाकला जात असे. म्हणजेच दररोज निर्माण होणारा कचरा हा पूर्णतः विघटनशील असायचा व उकिरड्यामध्ये संकलित केला तरी दरवर्षी तो कुजून शेतीच्या भरण- पोषणासाठी उपयुक्त ठरत असे.

माणूस साक्षर झाला पण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला : कोकरे
'MPSC'च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा!

अविघटनशील घटक

यामध्ये भंगार डबे, काच व प्लास्टिकच्या बाटल्या, धातू, रबर आदी वस्तू वेगळे साठवून भंगारमध्ये विकले जात असत. जुने कपडे गोधडी शिवण्यासाठी वापरली जात असत. प्लास्टिकचा वापर फारसा नव्हता. पेपर, पुट्टे कचऱ्यात येण्याजोगा वापर नव्हता. एकंदर लोकांची क्रयशक्ती फारशी नव्हती, त्यामुळे use & throw ही भावना नव्हती. दाट नागरी भागातही निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये विघटनशील घटकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका जागेवर संकलित होणारा कचरा खत म्हणून उपयुक्त ठरत असे.

1950 नंतरचे घनकचरा व्यवस्थापन

साधारणपणे 1950 नंतर प्लास्टिकचे प्रमाण झपाट्याने वाढले. कचऱ्यातील विघटनशील घटक कमी झाले प्लास्टिक व अनैसर्गिक घटकामुळे कचरा कुजण्यावर परिणाम झाला. उकिरडे पूर्वी पचन संस्थेप्रमाणे कार्य करत होती, त्यांची पचन संस्था धोक्‍यात आली. त्यातून डंपिंग ग्राउंडचा जन्म झाला व छोट्या खेड्यांपासून मोठ्या शहरांपर्यंत घनकचरा हा विषय जटिल बनला. वाद निर्माण होऊ लागले. नियोजनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागला.

वास्तव...

घनकचरा ही समस्या नसून रोजगाराची संधी आहे. परंतु घरामध्ये कचरा वेगवेगळ्या बीन्समध्ये ठेवण्याची सवय लागली पाहिजे. म्हणजेच प्रक्रिया करणे सुलभ होईल व डंपिंग ग्राउंड निर्माण होणार नाहीत. भारतामध्ये दररोज 152076 मे. टन एवढा कचरा निर्माण होतो. त्यापैकी 55759 मे. टन एवढ्या कचऱ्यावर प्रक्रिया होते. उर्वरित कचरा प्रक्रियेशिवाय डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. भारतात आजच्या स्थितीला 3159 इतकी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची डंपिंग ग्राउंड कचरामुक्त होण्याची व मोकळा श्वास घेण्याची वाट पाहात आहेत. परंतु प्रत्येक व्यक्तीला आपले घर स्वच्छ असावे, असे वाटते तसे शहर स्वच्छ राहू शकेल का? डंपिंग ग्राउंड निर्माण होऊच नयेत म्हणून प्रयत्न करता येऊ शकतील का? कचरा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत

त्यासाठी आपणास आपल्या स्वतःपासून सुरवात करायला हवी. आपली कचरा ठेवायची पद्धत बदलली पाहिजे. आपण एका डस्टबीनमध्ये कचरा ठेवतो तो सार्वजनिक ठिकाणी टाकतो अथवा महानगरपालिकेने सक्ती केल्यास वर्गीकरण करून कचरा घंटागाडीमध्ये टाकतो. परंतु एका डस्टबीनमध्ये साठविलेला कचरा पुन्हा वेगळा केला तरी अपेक्षित परिणाम साधता येत नाही. सर्व कचरा एकत्र आल्यानंतर दुर्गंधीयुक्त कचरा मूल्यवर्धन योग्य असणाऱ्या कचऱ्याच्या सान्निध्यात आल्यावर सर्व कचरा बाधित होतो आणि कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कचरा म्हणजे घाण, दुर्गंधी असाच समज होतो. एकदा कचरा डस्टबीनमध्ये टाकल्यानंतर तो पुन्हा हाताळला जाणार नाही अथवा सर्व कचरा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घट्ट बांधून फेकून दिला की आपल्या घरातील कचरा व्यवस्थापन झाले, असे आपण समजतो. प्लास्टिकचा अमर्याद वापर व वापरा आणि फेका ही सवय त्यामुळे महासागरामध्ये देखील सागरी जीवांना धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे परिसर विद्रूप होतोच शिवाय त्यामधून निघणाऱ्या विषारी वायूमूळे परिसर प्रदूषित होतो व परिसंस्था देखील धोक्‍यात येते. या सर्व पद्धती आपणास बदलणे आवश्‍यक आहे. घरात निर्माण होणारा कचरा वेगवेगळा ठेवण्याची पद्धत अवलंबली पाहिजे. वेंगुर्ला नगरपरिषदमध्ये 2015 साली 27 प्रकारात घराघरातून कचरा वर्गीकृत करून देण्याची पद्धत विकसित झाली, कर्जतमध्ये 2018 पासून 36 प्रकारात कचरा वर्गीकरण सुरू झाले. माथेरानमध्येही हीच संकल्पना अस्तित्वात आली. परिणामी या तिन्ही ठिकाणी डम्पिंग ग्राउंड कचरामुक्त झाले आहेत व भविष्यात येथील डम्पिंग ग्राउंड हे कचरामुक्तच राहील, एवढेच नाही तर येथील डम्पिंग ग्राउंड व कचरा व्यवस्थापन अभ्यासाचा विषय बनले आहे. कल्याण डोंबिवलीमध्येही हा प्रयोग यशस्वी होत आहे. येथील घनकचरा धनकचरा बनला आहे. देशात अनेक शहरांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजून नागरिकांच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे.

माणूस साक्षर झाला पण कचरा व्यवस्थापनात अडाणीच राहिला : कोकरे
10 जिल्ह्यांना अतिवृष्टी भरपाई नाहीच! 'या' 14 जिल्ह्यांसाठी 2860 कोटी

थोडक्‍यात, कचरा ही समस्या नसून राष्ट्रीय साधन-संपत्तीचे संवर्धन करण्याची संधी आहे, रोजगाराची संधी आहे. ओल्या कचऱ्यापासून Biogas, Bio CNG, विद्युत निर्मिती, कंपोस्ट खत आदी बाबी निर्माण करू शकतो तर सुक्‍या कचऱ्यातील प्लास्टिक, कागद, काच, रबर, धातू आदी वेस्ट, कपडे, चप्पल, बूट आदी घटक रिसायकलिंगसाठी उपयोगात आणू शकतो. म्हणजेच Reduce, Reuse, Recycle हा मूलमंत्र जपला पाहिजे. तसेच मूळ स्थानी जास्तीत जास्त घटकांमध्ये कचरा विलगीकरण केल्यास कचरा ही समस्या न राहता रोजगाराची संधी असेल आणि कचरा ही जागतिक समस्या असली तरी प्रत्येक व्यक्तीने सुरवात आपल्या स्वतःपासून करणे आवश्‍यक आहे, म्हणजेच Think Globally Act Locally.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()