प्राध्यापकांची कमालच! सहा-सात दिवसात तपासले ८० हजार पेपर; विद्यापीठाचे नवव्या दिवशीच निकाल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अवघ्या नऊ दिवसांतच काही अभ्यासक्रमांचा निकाल लावला आहे. आता उर्वरित अभ्यासक्रमांचाही निकाल जाहीर करण्याची अंतिम तयारी सुरु केली आहे. प्राध्यापकांनी सहा ते सात दिवसांत तब्बल ८० हजार पेपर तपासले आहेत.
solapur univercity
solapur univercitysakal
Updated on

सोलापूर : ‘ऑनस्क्रिन मूल्यमापन’ प्रक्रियेला आता गती आली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अवघ्या नऊ दिवसांतच काही अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. आता सत्र परीक्षेच्या उर्वरित अभ्यासक्रमांचाही निकाल जाहीर करण्याची अंतिम तयारी सुरु केली आहे. प्राध्यापकांनी सहा ते सात दिवसांत तब्बल ८० हजार पेपर तपासले आहेत. प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

परीक्षेनंतर विद्यापीठ व संलग्नित ११० महाविद्यालयातील जवळपास ८५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पूर्वी कोणते प्राध्यापक पॅनेलवर आहेत, सेवानिवृत्त व मृत प्राध्यापक देखील त्यात होते. पण, आता कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी प्राध्यापकांचा पॅनलच नवीन केला. प्राचार्यांची बैठक घेऊन निकालासंदर्भात सक्त सूचना केल्या.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यादृष्टीने त्यांनी विद्यापीठात स्वतंत्र व्यवस्थाच (डॅशबोर्ड) निर्माण केली. त्यामुळे कोणता प्राध्यापक दररोज आणि किती उत्तरपत्रिका तपासतोय, याची माहिती विद्यापीठात बसून मिळू लागली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आणि अवघ्या नऊ-दहा दिवसांतच सत्र परीक्षेचा निकाल जाहीर होऊ लागला आहे. सध्या पॅनेलवर एक हजार २२३ प्राध्यापक आहेत. निकाल वेळेत लागावा म्हणून पहाटे पाच ते रात्री १२ पर्यंत प्राध्यापकांनी मेहनत घेतल्याचाही आवर्जून उल्लेख कुलगुरूंनी ‘सकाळ’शी बोलताना केला.

प्रवेशपूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच

राज्याच्या ‘सीईटी’ सेलने विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व चाचणींच्या तारखा निश्चित केल्या आहेत. २० तारीख लास्ट मुदत दिली होती. त्यानुसार कुलगुरूंनी प्राचार्यांची बैठक घेऊन निकालासंदर्भात प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीची डेडलाईन दिली. त्यानुसार कामकाज अंतिम टप्प्यात आले असून आता २५ ते २८ जुलैदरम्यान प्रवेशपूर्व चाचण्या होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना २१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

१ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात

कोरोनामुळे विस्कळित झालेले शैक्षणिक वर्ष आता पूर्वपदावर आणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. आगामी शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व चाचण्या पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यासंबंधीची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()