Ajit Pawar: ...तर आमदार निधी सात कोटींवर नेणार होतो; अजित पवारांचे प्रतिपादन

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

बारामती, ता. 1- अर्थमंत्रीपदाच्या काळात मी चढत्या क्रमाने आमदारनिधी वाढविला, सत्ता टिकली असती तर यंदा प्रत्येक आमदाराला सात कोटी रुपये निधी मी देऊ केला असता, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

बारामतीतील प्रशासकीय भवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर अजित पवार बोलत होते. सोशल सर्व्हिस सेंटरच्या वतीने लिलावर्ध गुणवंत कर्मयोगी पुरस्कारांचे वितरण व गुणवंत कर्मचा-यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते केला गेला, त्या प्रसंगी ते बोलत होते.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, मुख्य अभियंता सुनील पावडे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसिलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे व स्मिता काळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक, प्रभाकर मोरे, शेखर कोठारी, साहिल कोठारी या प्रसंगी उपस्थित होते.

Ajit Pawar
Devendra Fadnavis : आम्हाला उद्धव ठाकरेंचा बदला घ्यायाचा....देवेंद्र फडणवीसांनी दिली कबूली

पवार म्हणाले, मी अर्थमंत्री असताना एक कोटींवरुन टप्याटप्याने आमदार निधी पाच कोटी रुपये केला होता, यंदा हाच निधी सात कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा मनोदय होता, पण सत्ता गेल्यामुळे हे काम झाले नाही.

पिंपरी चिंचवडमधील कोयता गँगने केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत बारामती परिसरातही दहशत निर्माण करणा-या सर्वांवर मग तो माझ्या शेजारी बसणारा असला तरी कारवाई करा, अशा सूचना पवार यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना दिल्या.

बारामती परिसरातील विविध विकासकामांचा आढावा त्यांनी या प्रसंगी घेतला. बारामतीत न्यूरोसर्जन डॉ. संजय व्होरा दर महिन्याच्या तिस-या शनिवारी मेडीकल कॉलेजमध्ये ओपीडी चालविणार आहेत, शहरातील इतर नामवंत डॉक्टरांनीही महिन्यातून एक दिवस तीन तास मेडीकल कॉलेजच्या ओपीडीसाठी वेळ दिली तर अनेक अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना त्याचा फायदा होईल, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉक्टरांनी हे काम करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Ajit Pawar
Devendra Fadnavis : राज्यातील जनतेला राज्य सरकारचं मोठं गिफ्ट; फडणवीसांनी दिली माहिती

बारामतीतील विविध सेवाभावी संस्थांनी शहरातील एकेका भागाची जबाबदारी स्विकारुन काम करावे, या पुढील काळात प्रत्येक गोष्टीसाठी शासकीय निधीवर अवलंबून न राहता लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

काय चाललय बारामतीत....

मध्यंतरी पोलिसांनी लॉजवर घातलेल्या धाडीमध्ये विद्यार्थी विद्यार्थीनी आढळून आल्याच्या प्रकारावर कमालीची नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी बारामतीत चाललय काय...असे म्हणत नाराजी व्यक्त करीत पालकांनीही मुलांवर लक्ष ठेवण्याची सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.